Lokmat Agro >शेतशिवार > Awakali Paus : पाऊस की आपत्ती? मे महिन्यात मराठवाड्यात मुसळधार अवकाळी वाचा सविस्तर

Awakali Paus : पाऊस की आपत्ती? मे महिन्यात मराठवाड्यात मुसळधार अवकाळी वाचा सविस्तर

latest news Awakali Paus: Rain or disaster? Heavy rains in Marathwada in May Read in detail | Awakali Paus : पाऊस की आपत्ती? मे महिन्यात मराठवाड्यात मुसळधार अवकाळी वाचा सविस्तर

Awakali Paus : पाऊस की आपत्ती? मे महिन्यात मराठवाड्यात मुसळधार अवकाळी वाचा सविस्तर

Awakali Paus : उन्हाळ्याच्या कडाक्यात मराठवाड्याने सध्या पावसाळ्याचा अनुभव घेतला आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने (Awakali Paus ) संपूर्ण मराठवाडा हादरून गेला असून, शेतकऱ्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येक वर्गावर या पावसाचा जबरदस्त परिणाम दिसून आला आहे.(Marathwada Awakali Paus)

Awakali Paus : उन्हाळ्याच्या कडाक्यात मराठवाड्याने सध्या पावसाळ्याचा अनुभव घेतला आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने (Awakali Paus ) संपूर्ण मराठवाडा हादरून गेला असून, शेतकऱ्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येक वर्गावर या पावसाचा जबरदस्त परिणाम दिसून आला आहे.(Marathwada Awakali Paus)

शेअर :

Join us
Join usNext

Awakali Paus : उन्हाळ्याच्या कडाक्यात मराठवाड्याने सध्या पावसाळ्याचा अनुभव घेतला आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने संपूर्ण मराठवाडा हादरून गेला असून, शेतकऱ्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येक वर्गावर या पावसाचा जबरदस्त परिणाम दिसून आला आहे. (Marathwada Awakali Paus)

मराठवाड्यावर अवकाळी पावसाचा प्रचंड तडाखा बसला असून, उन्हाळ्यातच पावसाळ्याची अनुभूती नागरिकांना येत आहे. गेल्या आठवडाभरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके जमीनदोस्त झाली आहेत. (Marathwada Awakali Paus)

काही भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, विजेचे खांब वाकले, जनावरे दगावली, रस्ते बंद पडले. एकूणच नैसर्गिक संकटाची झळ संपूर्ण मराठवाड्याला बसली आहे. फळबागा, भाजीपाला, खरीपपूर्व पिके यांचे प्रचंड नुकसान झाले असून, अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. (Marathwada Awakali Paus)

लातूर जिल्ह्यात पाच महसूल मंडळांत अतिवृष्टी

लातूर जिल्ह्यात औसा, निलंगा तालुक्यांतील काही भागांमध्ये बुधवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. औसा तालुक्यातील मातोळा येथे ८१ मि.मी, उजनीत ६९.५ मि.मी, निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथे ८२.३ मि.मी, कासार बालकुंदा येथे ६९.३ मि.मी आणि कासारशिरसीत ६८.८ मि.मी इतका पाऊस नोंदविण्यात आला. हा पाऊस अतिवृष्टीच्या श्रेणीत मोडतो.

धाराशिव जिल्ह्यात सात मंडळांत पावसाचा मारा

धाराशिव जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे ७ महसूल मंडळांत अतिवृष्टी नोंदवली गेली. बेंबळी, पाडोळी, केशेगाव, उमरगा, मूळज, माकणी आणि धाराशिव शहरात ६८ ते ८१ मि.मीपर्यंत पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे घरांची पत्रे उडून गेली, विजेच्या तारा तुटल्या आणि दोन जनावरे विजेचा शॉक लागून मृत्युमुखी पडली.

परभणी जिल्ह्यात २२ मंडळांत ३० मिमीहून अधिक पाऊस

परभणी जिल्ह्यात सलग ८ दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी सायंकाळपासून गुरुवारी सकाळपर्यंत २२ मंडळांमध्ये ३० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. सोनपेठ तालुक्यातील वडगाव येथे ५४.३ मिमी आणि पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथे ४७.८ मिमी पावसाची नोंद झाली.

नांदेड जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची दाणादाण

नांदेडमध्ये मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच गोची केली आहे. फळबागा, भाजीपाला, ज्वारी आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कंधार तालुक्यातील बाचोटी येथे पुलाची बाजू वाहून गेली असून, माहूर तालुक्यात काही भागात सलग चार तासांहून अधिक पाऊस झाला.

हिंगोली जिल्ह्यात वादळाचा तडाखा

हिंगोली जिल्ह्यात पंधरवड्यापासून अधूनमधून वादळी वाऱ्यांसह पाऊस सुरू आहे. या पावसात सुमारे ५०० विद्युत खांब वाकले असून काही पूर्णपणे कोसळले आहेत. यामुळे सुमारे ६३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे महावितरणने सांगितले आहे. विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे.

मराठवाड्यात सध्या अवकाळी पावसाच्या तडाख्याने हैराण झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांमध्येही पावसाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या भरपाईसाठी सरकारकडून पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.

हे ही वाचा सविस्तर : Cyclone Shakti Alert: चक्रीवादळ 'शक्ती'चा धोका; IMD ने जारी केला हाय अलर्ट वाचा सविस्तर

Web Title: latest news Awakali Paus: Rain or disaster? Heavy rains in Marathwada in May Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.