Agriculture News : नोव्हेंबर २०२५ मध्ये नाशिक आणि जळगाव तसेच फेब्रुवारी-२०२६ या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला होता. या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर पंचनामे केल्यांनतर संबंधित शेतकऱ्यांना निधी वितरणासाठी शासन निर्णय घेण्यात आला आहे.
नोव्हेंबर-२०२५ मध्ये राज्यात नाशिक विभागातील नाशिक व जळगांव जिल्ह्यांत "अवकाळी पाऊस" यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार रुपये १७ कोटी ०८ लक्ष ९० हजार इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.
फेब्रुवारी-२०२६ मध्ये राज्यात नागपूर विभागातील चंद्रपूर जिल्ह्यांत "अवेळी पाऊस" यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार रुपये १ कोटी ८५ लाख ३० हजार इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.
अ) चालू हंगामामध्ये यापूर्वी शेतीपिकांच्या नुकसानीकरिता वितरीत करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तांवातर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी. एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी.
ब) कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देतांना व्दिरुक्ती होणार नाही याची तहसिलदार यांनी व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी.
