भूमिअभिलेख विभागातील भूकरमापक संवर्गातील ९०३ पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. ३०) जाहीर करण्यात आला.
भूमिअभिलेख विभागाच्या 'महाभूमी' या संकेतस्थळावर तसेच संबंधित उपसंचालक, भूमिअभिलेख कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर सविस्तर यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भूकरमापक पदाच्या भरतीसाठी राज्यातून ३४ हजार ५३२ उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज केले होते. त्यापैकी ३० हजार ६५६ उमेदवारांनी आऑनलाइनपरीक्षा दिली.
ही परीक्षा १३ व १४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत दररोज दोन सत्रांमध्ये घेण्यात आली होती.
या निवड यादीतील संवर्गनिहाय पात्र उमेदवारांना नियुक्तीसाठी कागदपत्रांची छाननी उपसंचालक, भूमिअभिलेख कार्यालयामार्फत करण्यात येईल.
विभागनिहाय नावांची यादी पाहण्यासाठी
निकाल - पुणे विभाग
निकाल - मुंबई विभाग
निकाल - छत्रपती संभाजीनगर विभाग
निकाल - नाशिक विभाग
निकाल - नागपूर विभाग
निकाल - अमरावती विभाग
अधिक वाचा: Budget 2026 : यंदाच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना काय मिळालं; कोणत्या योजनेला किती निधी?
