lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > जलयुक्त शिवार; जो जिल्हा अधिक वेगाने कामे करेल, त्या जिल्ह्याला अधिक निधी मिळणार

जलयुक्त शिवार; जो जिल्हा अधिक वेगाने कामे करेल, त्या जिल्ह्याला अधिक निधी मिळणार

Jalyukta Shivar; The district which works faster will get more funds | जलयुक्त शिवार; जो जिल्हा अधिक वेगाने कामे करेल, त्या जिल्ह्याला अधिक निधी मिळणार

जलयुक्त शिवार; जो जिल्हा अधिक वेगाने कामे करेल, त्या जिल्ह्याला अधिक निधी मिळणार

‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ हे राज्य शासनाचे महत्वाकांक्षी अभियान आहे. या अभियानांतर्गत कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी हा कालावधी अनुकूल आहे. या अभियानात कृषी विभागाचा सहभाग वाढवीत कामांना गती द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ हे राज्य शासनाचे महत्वाकांक्षी अभियान आहे. या अभियानांतर्गत कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी हा कालावधी अनुकूल आहे. या अभियानात कृषी विभागाचा सहभाग वाढवीत कामांना गती द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

शेअर :

Join us
Join usNext

जलयुक्त शिवार अभियान २.०’ हे राज्य शासनाचे महत्वाकांक्षी अभियान आहे. या अभियानांतर्गत कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी हा कालावधी अनुकूल आहे. या अभियानात कृषी विभागाचा सहभाग वाढवीत कामांना गती द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी जलयुक्त शिवार अभियान २.० चा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे (दूरदृश्य संवाद प्रणालीव्दारे), मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. जो जिल्हा अधिक वेगाने कामे करेल, त्या जिल्ह्याला अधिक निधी दिला जाईल. लातूर, भंडारा, सोलापूर, सांगली, पुणे या ५ जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा  वेगाने प्रगती झाली आहे. इतर जिल्ह्यांनीही कामे अधिक वेगाने करावीत. जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील यश लक्षात घेता, राज्य शासनाने ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ चा दुसरा टप्पा  सुरू केला आहे. ज्यामध्ये पाणलोट विकास उपक्रमांच्या विविध कामांचा समावेश आहे, यामुळे पावसावर आधारित शेतीच्या समस्या कमी होण्यास मदत होऊन शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यास मदत होणार आहे.

अधिक वाचा: ड्रीप करताय? किती मिळेल अनुदान आणि कुठे कराल अर्ज

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेत धरणातील व गावतळ्यातील साठलेला गाळ काढून टाकून त्यांची साठवण क्षमता वाढविण्याबरोबरच या गाळाचा वापर शेतशिवारामध्ये करून, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीची गुणवत्ता वाढवण्यासाठी फायदा होईल, ज्यामुळे उत्पादन क्षमतेत वाढ होईल.  या वर्षात, आत्तापर्यंत, ५६५ तलावातून  सुमारे ८३.३९ लाख घनमीटर गाळ काढण्यात आला आहे, ज्यामुळे जवळपास ६००० लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना अनुदानाचा फायदा झाला आहे. या योजनेसाठी शांतीलाल मुथा आणि भारतीय जैन संघटनेचे तसेच इतर स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेत आहोत. त्यांना जिल्हा प्रशासनाने पूर्ण सहकार्य करावे असे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.

कृषी मंत्री श्री. मुंडे आणि श्री. मुथा यांनी जलयुक्त शिवार अभियान आणि गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानासाठी विविध सूचना केल्या. त्यांचीही कृषी व जलसंधारण विभागाने दखल घ्यावी असेही उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. यावेळी मृद व जलसंधारण विभागाचे सचिव सुनील चव्हाण यांनी जलयुक्त शिवार अभियान २.० च्या कामांच्या प्रगतीचा अहवाल सादरीकरणाव्दारे सादर केला.

यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम, मृद व जलसंधारण आयुक्त प्रकाश खपले, कोकण विभागीय आयुक्त डॉ. ‌महेद्र कल्याणकर, श्री. मुथा आणि भारतीय जैन संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीव्दारे उपस्थित होते.

Web Title: Jalyukta Shivar; The district which works faster will get more funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.