पुणे : वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना एक विद्यार्थी केवळ एकाच वर्षात कृषी क्षेत्रातील तब्बल २७ पेटंट रजिस्टर करून १७ पेटंटला ग्रँड मिळवतो. एवढेच नव्हे, तर त्याच वर्षात ३५ पेक्षा जास्त पुरस्कारही मिळवतो. एकाच वर्षात कृषी क्षेत्रातील सर्वात जास्त पेटंट रजिस्टर करून ग्रँड मिळवण्याचा विश्वविक्रम करणाऱ्या शिवम मद्रेवार या विद्यार्थ्यांची ही गोष्ट.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कोल्हापूर कृषी महाविद्यालयातील हा माजी विद्यार्थी. २०२४ मध्ये त्याने याच महाविद्यालयातून कृषी पदवी पूर्ण केली. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यापासून कायमच काहीतरी नवीन करण्याची, प्रयोग करण्याची आणि धडपड करण्याची शिवमची सवय. शिकताना सुचलेल्या नवीन संकल्पना, अभ्यासक्रमातील महत्वाच्या गोष्टी डायरी मध्ये लिहून ठेवल्यामुळे त्याला फायदा झाला.
दरम्यान, प्राध्यापकांकडून मिळालेल्या योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर त्याने वेगवेगळे प्रयोग केले आणि डिझाइन्स बनवल्या. आपण बनवलेले प्रॉडक्ट आणि डिझाइन्स या कृषी क्षेत्रातील आगळ्यावेगळ्या आणि फायद्याच्या ठरतील असं लक्षात आल्यानंतर शिवमचा पेटंट चा प्रवास सुरू झाला.
मागच्या वर्षी म्हणजे २०२४ मध्ये ०७ मे रोजी त्याने आपला पहिला पेटंट रजिस्टर केला. पॉलिथिन पिशव्या च्या डिझाईन संदर्भात हे पेटंट होते. दुसरे पेटंट हे सर्व फळे व भाज्या काढण्यासाठीचे मल्टीपर्पज हार्वेस्टर या प्रॉडक्टचे होते. त्यानंतर त्याने अनेक वेगवेगळ्या डिझाइन्स आणि उत्पादने तयार करून त्यासाठी पेटंट रजिस्टर केले. आत्तापर्यंत त्याने २७ पेटंट रजिस्टर केले असून त्यातील १७ पेटंटला ग्रँड मिळाले आहे.
मागच्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये त्याने सात मे पासून डिसेंबरच्या शेवटपर्यंत ११ पेटंट रजिस्टर केले होते तर त्यातील दहा पेटंटला ग्रँड मिळाले. कृषी क्षेत्रात एकाच वर्षात ११ पेटंट रजिस्टर करून १० पेटंटला ग्रँड मिळवणारा तो जगातील एकमेव विद्यार्थी ठरला.
शिवमने वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी केलेला हा विक्रम इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. यासोबतच तो इतर विद्यार्थ्यांनाही पेटंट मिळवण्या संदर्भात कायम मार्गदर्शन करत असतो. यासोबतच ज्या प्रॉडक्ट किंवा डिझाईनचे पेटंट मिळवले आहे त्या डिझाइन्स शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तो स्टार्टअप सुरू करणार आहे. मला जगातील सर्वात जास्त पेटंट मिळवणारा व्यक्ती म्हणून ओळख बनवायची आहे असं शिवम सांगतो.
पेटंटची यादी
१) Draftoid - Granted
२) Enhanced Multi Purpose Harvester - Granted
३) Rhizoguard - Granted
४) Rhinosafe - Granted
५) Pomo SHB Trap - Granted
६) Crop Shield Sprayer - Granted
७) Promo tri-Shield Trap - Registered
८) White grub IPM Trap - Granted
९) Phero snell defender - Granted
१०) AccuSponge Nozzle - Granted
११) Sub-Soil smart Applicator - Granted
१२) Packaging to avoid wastage of milk pouch - Registered
१३) Banana bio rhizo guard - Registered
१४) Light attraction based insect killing device - Granted
१५) AI Based animal Belt - Granted
१६) Plant Potometer - Granted
१७) Mastitis Controlling bottle - Granted
१८) Pomegranate albedo separator - Registered
१९) Grafting clips - Granted
२०) AI based vegetable seed germinator - Granted
२१) Wraping bag for fruit - Granted
२२) Shield for herbicide sprayer - Registered
२३) Wind operated insect sticky trap - Registered
२४) Vermi compost colonder - Registered
२५) Cut flower water phial - Registered
२६) AI based onion seed germinator - Registered
२७) Mushroom harvester - Registered
हेही वाचा : तीन महिन्यांत तीन लाखांचा नफा; संभाजीरावांच्या कारल्याच्या आधुनिक शेतीची यशोगाथा