Lokmat Agro >शेतशिवार > भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; शेती क्षेत्राला कसा होणार फायदा?

भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; शेती क्षेत्राला कसा होणार फायदा?

Historic free trade agreement between India and Britain; How will the agriculture sector benefit? | भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; शेती क्षेत्राला कसा होणार फायदा?

भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; शेती क्षेत्राला कसा होणार फायदा?

india britain free trade deal भारत आणि ब्रिटन यांनी गुरुवारी ऐतिहासिक मुक्त व्यापार समझोत्यावर (एफटीए) स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे दोन्ही देशांतील वार्षिक व्यापारात सुमारे ३४ अब्ज डॉलरची वाढ होण्याची अपेक्षा आहे.

india britain free trade deal भारत आणि ब्रिटन यांनी गुरुवारी ऐतिहासिक मुक्त व्यापार समझोत्यावर (एफटीए) स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे दोन्ही देशांतील वार्षिक व्यापारात सुमारे ३४ अब्ज डॉलरची वाढ होण्याची अपेक्षा आहे.

शेअर :

Join us
Join usNext

लंडन : भारत आणि ब्रिटन यांनी गुरुवारी ऐतिहासिक मुक्त व्यापार समझोत्यावर (एफटीए) स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे दोन्ही देशांतील वार्षिक व्यापारात सुमारे ३४ अब्ज डॉलरची वाढ होण्याची अपेक्षा आहे.

या करारामुळे ९९ टक्के भारतीय निर्यातीवरील शुल्क समाप्त होईल तसेच ब्रिटिश व्हिस्की, कार आणि इतर अनेक वस्तूंवरील शुल्कात कपात होईल.

पंतप्रधाननरेंद्र मोदी व ब्रिटिश पंतप्रधान केअर स्टार्मर यांच्या उपस्थितीत भारताचे वाणिज्यमंत्री पीयुष गोयल आणि ब्रिटिश वाणिज्यमंत्री जोनाथन रेनॉल्ड यांनी समझोत्यावर स्वाक्षऱ्या केल्या.

या भारतीय उद्योगांना होईल लाभ
वस्त्रोद्योग, चामडे, पादत्राणे, रत्ने व आभूषणे इ.

महाराष्ट्राला काय फायदा?
◼️ ऐतिहासिक भारत-इंग्लंड मुक्त व्यापार करारामुळे महाराष्ट्रातील शेतकरी, कारागीर आणि सेवा क्षेत्राला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे, असे ट्वीट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
◼️ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आंबा, द्राक्ष, फणस, बाजरी आणि सेंद्रिय उत्पादनांच्या निर्यातीत वाढ होणार.
◼️ हळद, काळीमिरी आणि विलायची यांना जागतिक बाजारपेठेत चांगली पोहोच व अधिक नफा मिळणार.
◼️ निर्यातीवर शून्य कर लावल्यामुळे कोल्हापुरी चामडी पादत्राणे उद्योगाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रोत्साहन, कोल्हापूरसारख्या लघु-मध्यम उद्योग केंद्रांना जागतिक दर्जाचा स्पर्धात्मक फायदा.

हा दिवस ऐतिहासिक आहे. कित्येक वर्षांच्या कठोर परिश्रमांनंतर हा करार झाला आहे. यामुळे भारतीय तरुण, शेतकरी, मच्छीमार आणि एमएसएमई क्षेत्रास लाभ होईल. तसेच भारतीयांना टिश उत्पादने स्वस्तात उपलब्ध होतील. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

भारतासोबत झालेला व्यापार समझोता हा ब्रिटनसाठी एक मोठा विजय आहे. समझोत्याचा दोन्ही देशांना लाभ होईल. लोकांच्या वेतनात वाढ होईल. राहणीमानाचा दर्जा सुधारेल. कामकरी लोकांच्या हातात अधिक पैसा खेळेल. - केअर स्टार्मर, ब्रिटिश पंतप्रधान

अधिक वाचा: नवीन शेतजमीन खरेदी केल्यास 'पीएम किसान' योजनेचा लाभ घेता येतो का? काय आहे नियम?

Web Title: Historic free trade agreement between India and Britain; How will the agriculture sector benefit?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.