Lokmat Agro >शेतशिवार > सव्वा लाख शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज

सव्वा लाख शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज

Half a million farmers will get electricity during the day | सव्वा लाख शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज

सव्वा लाख शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज

'अभियान २०२५' अंतर्गत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ७१ उपकेंद्रांच्या ठिकाणी २१४८ एकर जमिनीवर ३४५ मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा निर्मितीचे प्रकल्प उभारण्यात येत आहेत.

'अभियान २०२५' अंतर्गत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ७१ उपकेंद्रांच्या ठिकाणी २१४८ एकर जमिनीवर ३४५ मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा निर्मितीचे प्रकल्प उभारण्यात येत आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

कृषी सिंचनासाठी दिवसा वीज मिळण्यासाठी महावितरणतर्फे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतील पहिल्या टप्प्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. 'अभियान २०२५' अंतर्गत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ७१ उपकेंद्रांच्या ठिकाणी २१४८ एकर जमिनीवर ३४५ मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा निर्मितीचे प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यामुळे १ लाख २४ हजार शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा विजेची सोय होणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील ६१ आणि सांगली जिल्ह्यातील ९३ उपकेंद्र प्रतीक्षेत आहेत. सध्या सिंचनसाठी रात्री वीज मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सौर कृषी वाहिनीमळे त्यांना दिलासा मिळेल.

कोल्हापूर जिल्ह्यातील योजनेत समाविष्ट उपकेंद्र आणि गावे
करवीर कोगे: (बहिरेश्वर), बालिगा (आडूर)
गगनबावडा: गगनबावडा (गगनबावडा), मार्गेवाडी- निवडे (म्हाळुंगे)
पन्हाळा पडळ: (माजगाव), बाजारभोगाव (पिसात्रे), सातवे (सावर्डे तर्फे सातवे), वेतवडे (हारपवडे), (पाटपन्हाळा), कळे (परखंदळे) 
शाहूवाडी: शाहूवाडी (कोळगाव), सरुड (सरुड), वारुळ (वारुळ), मांजरे (मांजरे).
कागल: सिद्धनेर्लीीं (बामणी), सोनगे (बानगे व कुरुकली), केनवडे (केनवडे),
भुदरगड पिपळगाव: (बामणे), कडगाव (तिरवडे), तांबाळे (अनफ बुद्रुक), शेलोली (शेलोली)
हातकणंगले: चोकाक (हेलें), हातकणंगले (आळते)
कुंभोज: (नेज), हुपरी (रेंदाळ), किणी, वाठार (किणी व वाठार तर्फे वडगाव).
शिरोळ: कोथळी (कोथळी), अब्दुललाट (लाट), कोंडिग्रे (हरोली)
राधानगरी: सोळांकुर (नरतवडे)
चंदगड: चंदगड (काजिर्णे व चुर्णीचा वाडा), कोवाड (कवाड), हलकर्णी (डुक्करवाडी), हलकर्णी एमआयडीसी (जंगमहट्टी), पार्ले (पार्ले), माणगाव (माणगाव), अडकूर (आमरोली व उत्साळी)
गडहिंग्लज: नेसरी (सांबरे व तावरेडी), महागाव हरळी बुद्रुक), गडहिंग्लज एमआयडीसी (शेंदी), हेब्बाळ-कसबा तुल (हनिमनाळ व हासुरचंपू)
आजरा उत्तर: (मुमेवाडी व उत्तर), गवसे (हारपवडे)

इथे होतील सौरऊर्जा प्रकल्प
कोल्हापूर जिल्हा
४३ उपकेंद्र - ७९५ एकर जमीन 
१५९ मेगावॅट क्षमता
६५ हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज
सांगली जिल्हा
२८ उपकेंद्र - ११५३ एकर जमीन
१८६ मेगावॅट क्षमता
५९ हजार शेतकऱ्याना दिवसा वीज

शेतीला दिवसा अखंडित व शाश्वत वीज देण्यासाठी कृषी क्षेत्राचे सौरऊर्जीकरण करण्यात आहे. ३३/११ केव्ही उपकेंद्राच्या ठिकाणी ५ ते १० किलोमीटर परिघातील गायरान येणार पडीक जमिनीवर ०.५ ते २५ मेगावॅट क्षमतेचे सौरप्रकल्प उभारले जातील. - परेश भागवत, मुख्य अभियंता, कोल्हापूर परिमंडळ, महावितरण

सौर प्रकल्पासाठी शासकीय जमीन एक रुपये इतक्या दराने भाडेपट्टा तसेच पोटभाडेपट्ट्याने उपलब्ध करून देण्यास मान्यता मिळाली आहे. ज्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात प्रकल्प कार्यान्वित झाला असेल. त्यांना तीन वर्षासाठी ५ लाख रुपये प्रोत्साहनात्मक आर्थिक मदत देण्यात येणार आहे. - अंकुर कावळे, अधीक्षक अभियंता, कोल्हापूर, महावितरण

Web Title: Half a million farmers will get electricity during the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.