Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > सप्टेंबर महिन्यातील पिक नुकसानभरपाईचा जीआर आला; राज्यातील 'या' सात जिल्ह्यांच्या मदतीला मंजुरी

सप्टेंबर महिन्यातील पिक नुकसानभरपाईचा जीआर आला; राज्यातील 'या' सात जिल्ह्यांच्या मदतीला मंजुरी

GR for crop damage compensation for September has arrived; Approval for assistance to 'these' seven districts of the state | सप्टेंबर महिन्यातील पिक नुकसानभरपाईचा जीआर आला; राज्यातील 'या' सात जिल्ह्यांच्या मदतीला मंजुरी

सप्टेंबर महिन्यातील पिक नुकसानभरपाईचा जीआर आला; राज्यातील 'या' सात जिल्ह्यांच्या मदतीला मंजुरी

नैसर्गिक आपत्तीत मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना तसेच पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि घरांची पडझड झालेल्या नागरिकांना मदत थेट जिल्हास्तरावरूनच दिली जाणार आहे.

नैसर्गिक आपत्तीत मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना तसेच पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि घरांची पडझड झालेल्या नागरिकांना मदत थेट जिल्हास्तरावरूनच दिली जाणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील पिक नुकसानभरपाई बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला.

२१ लाख ६६ हजार १९८ शेतकऱ्यांच्या १५ लाख १६ हजार ६८१.२१ हेक्टर वरील बाधित पिकांच्या मदतीसाठी १३५६ कोटी ३० लाख २२ हजार रुपयांची मदत वितरित करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. 

सातारा
जिल्ह्यातील ११ हजार ११३ शेतकऱ्यांच्या चार हजार २१९.२८ हेक्टर वरील  बाधित पिकांच्या मदतीसाठी सहा कोटी २९ लाख तीन हजार रुपये

कोल्हापूर
जिल्ह्यातील पाच हजार ८६० शेतकऱ्यांच्या एक हजार ६९६.३६ हेक्टर वरील  बाधित पिकांच्या मदतीसाठी तीन कोटी १८ लाख रुपये

बीड
आठ लाख सहा हजार ५१३ शेतकऱ्यांच्या सहा लाख ४४ हजार ९१८.५५ हेक्टर वरील  बाधित पिकांच्या मदतीसाठी ५७७ कोटी ७८ लाख ९२ हजार रुपये.

धाराशिव
चार लाख चार हजार ६५६ शेतकऱ्यांच्या तीन लाख ११ हजार २९१.२३ हेक्टर वरील  बाधित पिकांच्या मदतीसाठी २९२ कोटी ४९ लाख २२ हजार रुपये

लातूर
चार लाख १५ हजार ४९२ शेतकऱ्यांच्या २३ लाख सहा हजार ६२८.९९ हेक्टर वरील  बाधित पिकांच्या मदतीसाठी २०२ कोटी ३८ लाख १९ हजार रुपये

परभणी
चार लाख ३९ हजार २९७ शेतकऱ्यांच्या दोन लाख ८५ हजार ८५३.७८ हेक्टर वरील  बाधित पिकांच्या मदतीसाठी २४५ कोटी ६४ लाख ४९ हजार रुपये

नांदेड
८३ हजार २६७ शेतकऱ्यांच्या ३२ हजार ७३.०२  हेक्टर वरील  बाधित पिकांच्या मदतीसाठी २८ कोटी ५२ लाख ३७ हजार रुपये.

नैसर्गिक आपत्तीत मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना तसेच पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि घरांची पडझड झालेल्या नागरिकांना मदत थेट जिल्हास्तरावरूनच दिली जाणार आहे. त्यामुळे शासनस्तरावर प्रस्ताव पाठविण्याची आवश्यकता राहणार नाही त्यांना मदत त्वरित व कार्यक्षम पद्धतीने वितरीत होईल.

अधिक वाचा: जुलै व ऑगस्ट महिन्यांतील अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांची भरपाई आली; कोणत्या विभागाला किती मदत?

Web Title: GR for crop damage compensation for September has arrived; Approval for assistance to 'these' seven districts of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.