Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > वनपट्टाधारक शेतकऱ्यांनीही मिळणार आता फार्मर आयडी; योजनांचा लाभ घेण्यासाठीचा मार्ग मोकळा

वनपट्टाधारक शेतकऱ्यांनीही मिळणार आता फार्मर आयडी; योजनांचा लाभ घेण्यासाठीचा मार्ग मोकळा

Farmers holding forest leases will now also get Farmer ID; Path clear to avail benefits of schemes | वनपट्टाधारक शेतकऱ्यांनीही मिळणार आता फार्मर आयडी; योजनांचा लाभ घेण्यासाठीचा मार्ग मोकळा

वनपट्टाधारक शेतकऱ्यांनीही मिळणार आता फार्मर आयडी; योजनांचा लाभ घेण्यासाठीचा मार्ग मोकळा

farmer id राज्यात डिजिटल कृषी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ॲग्रीस्टॅक (AgriStack) योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

farmer id राज्यात डिजिटल कृषी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ॲग्रीस्टॅक (AgriStack) योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

राज्यात डिजिटल कृषी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ॲग्रीस्टॅक (AgriStack) योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

शासन निर्णयानुसार कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी Farmer ID नोंदणी अनिवार्य करण्यात आलेला आहे.

वनहक्क अधिनियम, २००६ अंतर्गत अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी समुदायांना त्यांच्या वनजमिनीवरील हक्क प्रदान करण्यात आलेले आहेत.

त्या अनुषंगाने राज्यातील वनपट्टा धारक शेतकऱ्यांची Farmer ID नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

वनपट्टा धारक शेतकऱ्यांनी आपल्या जवळील नागरी सुविधा केंद्र (CSC) येथे भेट देऊन आवश्यक  कागदपत्रांसह Farmer ID नोंदणी करून घ्यावी. या नोंदणीसाठी शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

Farmer ID नोंदणी झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना कृषि विभागाच्या विविध योजना, अनुदान, पीकविमा, नैसर्गिक आपत्ती सहाय्य तसेच इतर डिजिटल कृषी सेवांचा लाभ सुलभपणे मिळण्यास मदत होणार आहे.

अधिक वाचा: यंदा दुष्काळाची शक्यता; वाचा मान्सूनबाबत हवामान विभागाने दिलेला पहिला दीर्घकालीन अंदाज

Web Title : वन भूमि धारक किसानों के लिए किसान आईडी: योजनाओं तक पहुंच खुली

Web Summary : महाराष्ट्र में वन भूमि धारक अब किसान आईडी प्राप्त कर सकते हैं, जिससे कृषि योजनाओं, सब्सिडी, फसल बीमा और आपदा राहत तक पहुंच संभव हो सकेगी। एक विशेष अभियान CSC केंद्रों पर मुफ्त पंजीकरण की सुविधा प्रदान करता है, जिससे डिजिटल कृषि सेवाओं तक पहुंच आसान हो जाएगी।

Web Title : Farmer ID for Forest Land Holders: Access to Schemes Opens

Web Summary : Forest landholders in Maharashtra can now obtain Farmer IDs, enabling access to agricultural schemes, subsidies, crop insurance, and disaster relief. A special drive facilitates registration at CSC centers free of charge, streamlining access to digital agricultural services.