शासनाकडून सबसिडी मिळवून देतो तसेच कमी किमतीत शेडनेट उभारून देतो, असे आश्वासन देत बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील सात शेतकऱ्यांची तब्बल ६६ लाख ८० हजार २२९ रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहन लक्ष्मण फाळके (वय ५०, रा. अटाळी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ही घटना २७ ऑक्टोबर २०२१ ते ४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत अटाळी येथे घडली. आरोपी माधव मोतीराम पांढरे उर्फ पाटील (वय ५०, रा. गवढाळा) यांनी शेतकऱ्यांना सबसिडी मिळवून देण्याचे आमिष दाखवले.
यासाठी त्यांच्या कर्ज खात्यातील रक्कम माऊली एरिगेशन व भारत एरिगेशन या फर्मच्या नावावर वळविण्याची व्यवस्था केली; मात्र प्रत्यक्षात शेडनेट उभारण्यात जाणूनबुजून विलंब करून संबंधित निधी स्वतःच्या फायद्यासाठी वापरला.
फिर्यादींसह शेतकरी रामेश्वर आत्माराम वाळके, भगवान तुळशीराम महानकर, कैलास सोपान डिक्कर आणि अमीर अतीफ शेख अनिस (सर्व रा. अटाळी) यांची प्रत्येकी सुमारे १३ लाख रुपयांची फसवणूक झाली.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या नावावर कर्जाचा बोजा वाढला असून, फिर्यादींच्याच नावावर जिजाऊ बँकेचे २९ लाख ८५ हजार २२९ रुपयांचे कर्ज थकीत आहे. या फसवणुकीत एकूण ६६ पोलिसांनी सांगितले. पुढील तपास लाख ८० हजार २२९ रुपयांचा अपहार झाल्याचे पोलिस उपनिरीक्षक राची पुसाम यांच्या मार्गटर्शनाखाली सरू आरे
माधव पाटील यास अटक
खामगाव ग्रामीण पोलिसांनी आरोपी माधव पाटील यास अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर ५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा : तुमच्याही नारळाच्या झाडाला नारळ लागत नाही? जाणून घ्या कारणं आणि सोपे उपाय