Lokmat Agro >शेतशिवार > Farmer id : पीएम किसानच्या पुढील हप्त्यासाठी फार्मर आयडी महत्वाचे; राज्यात किती शेतकऱ्यांनी केली नोंदणी?

Farmer id : पीएम किसानच्या पुढील हप्त्यासाठी फार्मर आयडी महत्वाचे; राज्यात किती शेतकऱ्यांनी केली नोंदणी?

Farmer id : Farmer ID is important for the next installment of PM Kisan; How many farmers have registered in the state? | Farmer id : पीएम किसानच्या पुढील हप्त्यासाठी फार्मर आयडी महत्वाचे; राज्यात किती शेतकऱ्यांनी केली नोंदणी?

Farmer id : पीएम किसानच्या पुढील हप्त्यासाठी फार्मर आयडी महत्वाचे; राज्यात किती शेतकऱ्यांनी केली नोंदणी?

Farmer id अॅग्रीस्टॅक योजनेत शेतकऱ्यांचा नोंदणीतील सहभाग वाढला आहे. राज्यात आतापर्यंत ७६ लाख ३९ हजार ८५२ शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आला आहे.

Farmer id अॅग्रीस्टॅक योजनेत शेतकऱ्यांचा नोंदणीतील सहभाग वाढला आहे. राज्यात आतापर्यंत ७६ लाख ३९ हजार ८५२ शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

पुणे : अॅग्रीस्टॅक योजनेत शेतकऱ्यांचा नोंदणीतील सहभाग वाढला आहे. राज्यात आतापर्यंत ७६ लाख ३९ हजार ८५२ शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आला आहे. यात अहिल्यानगर जिल्ह्याने आघाडी घेत ५ लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

दरम्यान, आधार कार्डावरील माहिती आधारे हे ओळखपत्र देण्यात येत असून, आधारमधील ८० टक्के माहिती जुळली तरी ओळख क्रमांक देण्यात येत आहेत.

आता त्यापेक्षा कमी माहिती जुळत असली तरी पडताळणी करून अशा अर्जावरही तलाठ्यांनी कार्यवाही करावी, असे निर्देश भूमी अभिलेख विभागाने दिले आहेत. मात्र, असा अर्ज स्वीकारण्याचा किंवा फेटाळण्याचा अधिकार तलाठ्यांनाच असल्याचेही स्पष्ट केले.

२१ व्या हप्त्यासाठी अॅग्रीस्टॅक योजनेत नोंदणी आवश्यक करण्यात आली
-
केंद्र सरकारने पीएम किसान या योजनेचा २० वा हप्ता नुकताच शेतकऱ्यांना थेट निधी हस्तांरणाद्वारे जमा केला आहे. मात्र, २१ व्या हप्त्यासाठी अॅग्रीस्टॅक योजनेत नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे.
- त्यामुळे शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक योजनेत नोंदणी करण्यासाठी सहभाग वाढविला आहे. त्यानुसार राज्यात आतापर्यंत ७६ लाख ३९ हजार ८५२ शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आला आहे.
- यात आतापर्यंत आघाडीवर असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याने अव्वल क्रमांक कायम ठेवला असून, जिल्ह्याने ओळख क्रमांकाचा पाच लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

अधिक वाचा: Farmer id : फार्मर आयडी नंबर मिळायला सुरवात; कसे चेक कराल तुमच्या आयडीचे स्टेटस? वाचा सविस्तर

जिल्हानिहाय ओळख क्रमांक मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या
मुंबई उपनगर ३४६
पालघर ७८,२०१
ठाणे ५४,२५८
रायगड ७४,४९२
रत्नागिरी १,१२,५३४
सिंधुदुर्ग ७३,४१६ 
धुळे १,४९,८१८ 
नाशिक ४,५०,६४० 
पुणे ४,३४,६६२
सातारा ४,०३,१६६
सांगली २,६४,७३२
कोल्हापूर ३,८३,५४२
सोलापूर ३,८९,२३२
अहिल्यानगर ५,०९,९८८
छ. संभाजीनगर २,५२,८७१
जालना २,२०,२४२
लातूर १,९९,४७५
अकोला १,५१,२७८
वाशिम १,३१,२५९
अमरावती २,४७,२६६
यवतमाळ २,६६,५९०
चंद्रपूर १,९२,५१६
गडचिरोली १,२१,५६५
गोंदिया १,९०,६४४
परभणी १,८५,००३
नांदेड २,५१,०१७
हिंगोली १,४८,५९४
बीड २,९०,१९५
धाराशिव १,७५,९०६
भंडारा १,६२,१५८
नंदुरबार ९५,५८२
जळगाव ३,७६,८७८
बुलढाणा ३,०४,७३७
वर्धा १,५२,७५१
नागपूर १,४७,३२८
एकूण ७६,३९,८५२

आधारची माहिती जुळावी
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये याबाबत आघाडी घेऊन ५ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. आधार कार्डावरील माहितीच्या आधारे ओळखपत्र दिले आहेत. आधारमधील ८० टक्के माहिती जुळली तरी ओळख क्रमांक दिले जाते. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ५ लाख ९ हजार ९८८ शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आला आहे. त्या खालोखाल नाशिक जिल्ह्यात ४ लाख ५० हजार ६४० शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आला आहे. तिसऱ्या क्रमांकावर पुणे जिल्हा आहे. जिल्ह्यात ४ लाख ३४ हजार ६३२ शेतकऱ्यांना ओळख क्रमांक दिले आहेत.

राज्यात अॅग्रीस्टॅक योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढत आहे. तलाठ्यांकडून योजनेला गती देण्यात आली आहे. तसेच आधार माहिती जुळण्याबाबत पडताळणी करून तो अर्ज मान्य करण्याबाबत सांगण्यात आले आहे. - सरिता नरके, राज्य संचालक, अॅग्रीस्टॅक, भूमिअभिलेख विभाग, पुणे

Web Title: Farmer id : Farmer ID is important for the next installment of PM Kisan; How many farmers have registered in the state?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.