पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या आंबिया बहार २०२५-२६ करिता केळी, मोसंबी, पपई, संत्रा, आंबा व डाळिंब या पिकांसाठी शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
त्यात द्राक्ष व स्ट्रॉबेरीसाठी १४ तर केळी, मोसंबी, पपईसाठी ३१ ऑक्टोबर अंतिम मुदत आहे, अशी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
ही योजना पुणे, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यात बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, पुणे मार्फत राबविण्यात येत आहे.
योजनेत सहभागी होण्यासाठी द्राक्ष व स्ट्रॉबेरी पिकासाठी १५ ऑक्टोबर, केळी, मोसंबी, पपईसाठी ३१ ऑक्टोबर, संत्रा पिकासाठी ३० नोव्हेंबर, आंबा पिकासाठी ३१ डिसेंबर व डाळिंब पिकासाठी १४ जानेवारी २०२६ याप्रमाणे अंतिम मुदत राहील.
ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होणार आहेत किंवा नाही.
असे आहे योजनेचे स्वरूप
◼️ योजनेबाबत घोषणापत्र आवश्यक राहील. योजनेत सहभाग नोंदवण्यासाठी अधिसूचित फळबागांचे प्रतिशेतकरी कमीत कमी २० गुंठे व जास्तीत जास्त ४ हेक्टर इतके उत्पादनक्षम क्षेत्र असणे आवश्यक आहे.
◼️ सहभागासाठी अॅग्रीस्टॅक नोंदणी, आधार, बँक खाते तपशील, जमीन धारणा उतारा, फळबागेचा जिओ टॅगिंग फोटो, भाडेपट्टीने शेती करणाऱ्यास नोंदणीकृत भाडेकरार, ई-पीक पाहणी आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी
माहितीसाठी जवळील कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा https://pmfby.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अधिक वाचा: तुकडेबंदीखालील रखडलेले जमिनीचे व्यवहार होणार सुलभ; कुणाला कसा होणार फायदा? वाचा सविस्तर