Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > इथेनॉल निर्मितीमुळे येऊ शकतो दुष्काळ; वाचा १ लिटर इथेनॉल बनविण्यासाठी लागतंय किती पाणी?

इथेनॉल निर्मितीमुळे येऊ शकतो दुष्काळ; वाचा १ लिटर इथेनॉल बनविण्यासाठी लागतंय किती पाणी?

Ethanol production can cause drought; Read: How much water is needed to make 1 liter of ethanol? | इथेनॉल निर्मितीमुळे येऊ शकतो दुष्काळ; वाचा १ लिटर इथेनॉल बनविण्यासाठी लागतंय किती पाणी?

इथेनॉल निर्मितीमुळे येऊ शकतो दुष्काळ; वाचा १ लिटर इथेनॉल बनविण्यासाठी लागतंय किती पाणी?

देशाची परकीय चलनाची बचत करण्यासाठी आणि प्रदूषणावर उतारा म्हणून केंद्र सरकार 'इथेनॉल ब्लेडिंग'चा (पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळणे) धडाका लावत आहे.

मात्र, १ लिटर इथेनॉल तयार करण्यासाठी तब्बल १०,७९० लिटर पाणी खर्ची पडत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

कोणत्या धान्यापासून १ लिटर इथेनॉलसाठी किती पाणी लागते?
◼️ तांदूळ : १०,७९० लिटर.
◼️ मका : ४,६७० लिटर.
◼️ ऊस : ३,६३० लिटर.

धोक्याची घंटा काय?
◼️ २०३० पर्यंत दिल्ली, बंगळुरू, चेन्नईसह २१ शहरांतील भूजलपातळी संपण्याचा धोका आहे.
◼️ महाराष्ट्र राज्यात ३९६ कोटी लिटर इथेनॉल निर्मितीची क्षमता; पण लोकांना टँकरची वाट पाहावी लागते.

गरिबांच्या ताटातून थेट टाकीत
◼️ सार्वजनिक वितरण प्रणालीतील तुटलेल्या तांदळाचा वाटा २५% वरून १०% वर आणला आहे.
◼️ उरलेला तांदूळ थेट डिस्टिलरीमध्ये इथेनॉलसाठी वळवला जात आहे.

बोलके आकडे
◼️ १८२२ कोटी लिटर भारताची एकूण इथेनॉल उत्पादन क्षमता आहे.
◼️ ४७० लिटर इतकेच इथेनॉल १ टन तांदळापासून मिळते.
◼️ १५% इतके सध्या पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण आहे.

तांदळाचा 'खेळ' पाणी करणार?
◼️ सरकारने २०२५-२६ या वर्षासाठी २० लाख टन तांदूळ इथेनॉल निर्मितीसाठी राखून ठेवला आहे.
◼️ यासाठी गरिबांना रेशनवर मिळणाऱ्या तांदळाच्या वाट्यातही कपात केली आहे.
◼️ मात्र, १ किलो तांदूळ पिकविण्यासाठी लागणारे ३००० ते ५००० लिटर पाणी व त्यापासून मिळणारे अत्यल्प इथेनॉल हे समीकरण घातक ठरतेय.

अधिक वाचा: एल-निनोचा प्रभाव तरीही राज्यात मान्सून वेळेवरच येणार; वाचा जेष्ठ हवामानतज्ञ डॉ.साबळे यांचा अंदाज

Web Title: Ethanol production can cause drought; Read: How much water is needed to make 1 liter of ethanol?