Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > डी.वाय.पाटील कारखान्याकडून ऊस बिले खात्यावर जमा; १ ते १५ जानेवारी दरम्यान प्रतिटन कसा दिला दर?

डी.वाय.पाटील कारखान्याकडून ऊस बिले खात्यावर जमा; १ ते १५ जानेवारी दरम्यान प्रतिटन कसा दिला दर?

D.Y.Patil factory deposited sugarcane bills into account; How was the rate per ton paid between January 1 and 15? | डी.वाय.पाटील कारखान्याकडून ऊस बिले खात्यावर जमा; १ ते १५ जानेवारी दरम्यान प्रतिटन कसा दिला दर?

डी.वाय.पाटील कारखान्याकडून ऊस बिले खात्यावर जमा; १ ते १५ जानेवारी दरम्यान प्रतिटन कसा दिला दर?

sugarcane bill कारखान्याने १५ फेब्रुवारी अखेर ४ लाख ३ हजार ८३० टन उसाचे गाळप करून ३ लाख ७८ हजार ३५० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे.

sugarcane bill कारखान्याने १५ फेब्रुवारी अखेर ४ लाख ३ हजार ८३० टन उसाचे गाळप करून ३ लाख ७८ हजार ३५० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे.

असळज (ता. गगनबावडा) येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळित हंगामातील १ ते १५ जानेवारी २०२६ या पंधरवड्यात गाळप केलेल्या ६१ हजार ७६१ टन उसाचे प्रतिटन ३,४५० रुपयाप्रमाणे बील देण्यात येणार आहे.

या ऊस बिलापोटी कारखान्याकडून देण्यात येणारी रक्कम २१ कोटी २० लाख ४३ हजार इतकी होते. १ ते १५ जानेवारी या दरम्यान गाळप झालेल्या ऊसास प्रतिटन ३ हजार ४५० रुपये दिले जाणार आहेत.

ही रक्कम संबंधित ऊस पुरवठादार शेतकरी सभासद, बिगर सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी दिली.

कारखान्याने १५ फेब्रुवारी अखेर ४ लाख ३ हजार ८३० टन उसाचे गाळप करून ३ लाख ७८ हजार ३५० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे.

कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पातून या हंगामात आजअखेर ३ कोटी ८७ लाख २७ हजार ४० युनिट विजेची निर्मिती केली असून, यातून कारखाना वापर वजा जाता २ कोटी ५८ लाख ५८ हजार युनीट वीज निर्यात केली आहे.

यावेळी कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक जयदीप पाटील, सेक्रेटरी नंदकुमार पाटील यांच्यासह, सर्व संचालक, कारखान्याचे विविध विभागाचे अधिकारी, कृषी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

अधिक वाचा: नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार का? वाचा सविस्तर

Web Title : डी.वाय. पाटिल कारखाने ने गन्ना बिल जमा किए; प्रति टन दर का खुलासा

Web Summary : डी.वाय. पाटिल चीनी कारखाने ने 1-15 जनवरी, 2026 के लिए ₹3,450/टन पर गन्ना बिल जमा किए, कुल ₹21.20 करोड़। 4.03 लाख टन गन्ने की पेराई से 3.78 लाख क्विंटल चीनी का उत्पादन हुआ। अतिरिक्त बिजली का भी निर्यात किया गया। इसकी घोषणा विधायक सतेज पाटिल ने की।

Web Title : D.Y. Patil Factory Deposits Sugarcane Bills; Rate Per Ton Revealed

Web Summary : D.Y. Patil Sugar Factory credited sugarcane bills at ₹3,450/ton for January 1-15, 2026, totaling ₹21.20 crore. 4.03 lakh tons of sugarcane crushed, producing 3.78 lakh quintals of sugar. Surplus electricity was also exported. This was announced by MLA Satej Patil.