Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > डी.वाय पाटील सहकारी साखर कारखान्याचे ऊस बिल जमा; प्रतिटन कसा दिला दर?

डी.वाय पाटील सहकारी साखर कारखान्याचे ऊस बिल जमा; प्रतिटन कसा दिला दर?

D.Y. Patil Cooperative Sugar Factory's sugarcane bill deposited; How was the price per ton given? | डी.वाय पाटील सहकारी साखर कारखान्याचे ऊस बिल जमा; प्रतिटन कसा दिला दर?

डी.वाय पाटील सहकारी साखर कारखान्याचे ऊस बिल जमा; प्रतिटन कसा दिला दर?

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामातील १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या पंधरवड्यात गाळप केलेल्या ७५ हजार ६०६ टन उसाचे बिल जमा केले आहे.

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामातील १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या पंधरवड्यात गाळप केलेल्या ७५ हजार ६०६ टन उसाचे बिल जमा केले आहे.

कोल्हापूर : असळज (ता. गगनबावडा) येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामातील १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या पंधरवड्यात गाळप केलेल्या ७५ हजार ६०६ टन उसाचे बिल जमा केले आहे.

प्रतिटन ३४५० रुपयांप्रमाणे होणारी ऊस बिलाची रक्कम २६ कोटी ८ लाख ४२ हजार संबंधित ऊस पुरवठादार शेतकरी सभासद, बिगर सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी दिली.

कारखान्याने २ फेब्रुवारी अखेर ३ लाख ८१ हजार २७० टन उसाचे गाळप करून ३ लाख ५२ हजार ९५० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे.

कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पातून या हंगामात आजअखेर ३ कोटी ४४ लाख ७५ हजार ८५६ युनिट विजेची निर्मिती केली असून, यातून कारखाना वापर वजा जाता २ कोटी २६ लाख ९७ हजार युनिट वीज निर्यात केली आहे.

कारखान्याचा डिस्टीलरी व को-जनरेशन प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू असून, चालू गळीत हंगामातील गाळप उद्दिष्ट पूर्ततेसाठी कारखान्याचे सर्व ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासदांनी पिकवलेला संपूर्ण ऊस कारखान्याकडे गळितास पाठवून सहकार्य करावे.

असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले. यावेळी कारखान्याचे संचालक, कार्यकारी संचालक जयदीप पाटील, सचिव नंदकुमार पाटील आदी उपस्थित होते.

अधिक वाचा: शासनाने बिगरशेती एनए परवानगी देण्याचे कलेक्टरचे अधिकार काढले; आता कोण देणार परवानगी?

Web Title : डी. वाय. पाटिल चीनी मिल ने गन्ना बिल का भुगतान किया; प्रति टन दर?

Web Summary : डी. वाय. पाटिल चीनी मिल ने 75,606 टन गन्ने के लिए ₹3450 प्रति टन की दर से ₹26.08 करोड़ गन्ना बिल जमा किया। मिल ने 3,81,270 टन गन्ने की पेराई की और 3,44,75,856 यूनिट बिजली पैदा की।

Web Title : D.Y. Patil Sugar Factory Pays Cane Bill; Rate Per Ton?

Web Summary : D.Y. Patil Sugar Factory deposited ₹26.08 crore as cane bill at ₹3450 per ton for 75,606 tons of sugarcane. The factory crushed 3,81,270 tons of sugarcane and generated 3,44,75,856 units of electricity.