अचानक कडक उष्णतेनंतर हवामान झपाट्याने बदलते आणि नंतर कधी कधी वादळ आणि पाऊस पडतो. त्याचा आरोग्यावरही परिणाम होतो.
कडक उन्हाळ्यात थंड पाणी पिणे आणि पावसात आईस्क्रीम खाल्ल्याने घशात सूज आणि दुखणे होते. काही लोकांसाठी हा त्रास इतका वाढतो की त्यामुळे तापही येतो.
सर्दी-खोकला पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात सर्वाधिक असतो, त्याचा परिणाम घशावर होतो. कधीकधी घशात अॅलर्जी देखील होते. ज्यामुळे खाण्या-पिण्यात त्रास होतो. सध्या अशा अनेक रुग्णांचे प्रमाण वाढत आहे.
कारणे काय?
- कडक उष्णतेनंतर हवामान झपाट्याने बदलते आणि नंतर कधी कधी वादळ आणि पाऊस पडतो त्याचा आरोग्यावरही परिणाम होतो.
- कडक उन्हाळ्यात थंड पाणी पिणे आणि पावसात आइस्क्रीम खाल्ल्याने घशात सूज आणि दुखणे होते.
- सर्दी-खोकला पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात सर्वाधिक असतो, त्याचा परिणाम घशावर होतो.
- कधीकधी घशात अॅलर्जी देखील होते. ज्यामुळे खाण्या-पिण्यात त्रास होतो.
- थ्रोट इन्फेक्शन हे स्ट्रेप्टोकोकस बॅक्टेरिया, विशेषतः स्ट्रेप्टोकोकस पायोजेन्स या गटाच्या संसर्गामुळे होते.
काय काळजी घ्याल?
◼️ मिठाच्या पाण्याने गुळण्या करा
घसा दुखणे, सूज येणे किंवा दुखणे दूर करण्यासाठी मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्या. यामुळे घशाला खूप आराम मिळतो. गुळण्यांसाठी पाणी थोडे कोमट असावे.
◼️ कोमट पाण्याने सूज दूर होईल
घशात सूज असेल तर कोमट पाणी प्यावे. थंड पाण्याने ही समस्या वाढू शकते. कोमट पाणी प्यायल्याने संसर्ग हळूहळू कमी होतो. तुम्हाला हवे असल्यास पाण्यात थोडी हळदही टाकू शकता. त्यामुळे सूज कमी होईल.
◼️ मधामुळे मिळेल आराम
घसा खवखवणे किंवा कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन असल्यास मधाचे सेवन करावे. मधामध्ये अँटिबायोटिक गुणधर्म असतात जे घसादुखी, खोकला आणि सर्दीपासून आराम देतात. मथामुळे घसा खवखवणे आणि सूज यांमध्येही आराम मिळतो.
◼️ हळदीचे दूध प्या
घसा खवखवणे आणि दुखत असल्यास रात्री हळदीचे दूध प्यावे. हळदीमध्ये अँटिबायोटिक आणि ऑटसेप्टिक घटक असतात जे जळजळ आणि वेदना कमी करतात. हळद घशासाठी फायदेशीर आहे.
◼️ आले खावे
घसादुखी किंवा सर्दी खोकला झाल्यास आल्याचा वापर करा. आल्यामध्ये शक्तिशाली औषधी गुणधर्म असतात. घसादुखीपासून सुटका मिळवण्यासाठी आल्याचा तुकडा किसून एक ग्लास पाण्यात टाकून उकळा. ५ मिनिटे उकळल्यानंतर ते पाणी गाळून कोमट प्या.
घरगुती विविध उपायांवर वाढता भर
◼️ घशात सूज असेल तर कोमट पाणी प्यावे. थंड पाण्याने ही समस्या वाढू शकते. कोमट पाणी प्यायल्याने संसर्ग हळूहळू कमी होतो. तुम्हाला हवे असल्यास पाण्यात थोडी हळदही टाकू शकता.
◼️ घसा दुखणे, सूज येणे किंवा दुखणे दूर करण्यासाठी मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्या. यामुळे घशाला खूप आराम मिळतो. वरील सर्व उपाय करताना डॉक्टरांचा सल्ला घेणे ही महत्वाचे आहे.
अधिक वाचा: उन्हाच्या पारा करतोय शरीरावर मारा; शेतकऱ्यांनो 'या' लक्षणांना टाळू नका