खजूर प्रामुख्याने सौदी अरेबिया, इराण, इराक, संयुक्त अरब अमिरात, उत्तर आफ्रिकेतील इजिप्त, अल्जेरिया, ट्यूनिशिया येथे पीक घेतले जाते.
हे फळ पिकण्यासाठी, परिपक्व होण्यासाठी कोरडे आणि उबदार हवामान महत्त्वाचे असते. दक्षिण युरोप, आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियासारख्या अनेक देशांमध्येही खजूर लागवड केली जाते.
खजूर Dates हे अतिशय पौष्टिक फळ आहे. त्यामध्ये भरपूर ऊर्जा, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. हे नैसर्गिक गोडवा देणारे फळ आहे. नवरात्रोत्सवाच्या उपवासाच्या काळात खजूर मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते.
खजुराचे प्रकार
अजवा, मेदजूल, सफावी, मबरूम, सुगई, खालस, डेग्लेट नूर इ.
खजूर खाण्याचे फायदे
१) ऊर्जा मिळविण्यास मदत
खजूरमध्ये नैसर्गिक साखर (ग्लुकोज, फ्रक्टोज, सुक्रोज) असते जी शरीराला झटपट ऊर्जा देते.
२) पचनशक्ती सुधारते
खजूरमध्ये भरपूर प्रमाणात तंतूमय पदार्थ (फायबर) असल्याने पचन सुधारते व बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
३) रक्तशुद्धी व हिमोग्लोबिन वाढवते
खजूरमध्ये लोह (Iron) असल्याने रक्ताची कमतरता (अॅनिमिया) दूर करण्यास मदत होते.
४) हाडे व दात मजबूत होतात
कॅल्शियम, मॅग्नेशियम व फॉस्फरस खजूरमध्ये असल्याने हाडे मजबूत राहतात.
५) हृदयासाठी लाभदायक
खजूरमध्ये पोटॅशियम असल्याने रक्तदाब संतुलित ठेवण्यास व हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
६) मेंदूची कार्यक्षमता सुधारते
खजूरमध्ये अँटिऑक्सिडंट्स असल्यामुळे मेंदूचे आरोग्य टिकवून ठेवण्यात फायदा होतो.
७) गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी उपयोगी
खजूरमध्ये पोषक घटक असल्यामुळे गर्भवती महिलांना व नवमातांना ऊर्जा मिळते.
८) त्वचा व केसांसाठी फायदेशीर
विटामिन सी व डी असल्यामुळे त्वचेची लवचिकता व केसांची ताकद टिकून राहते.
९) रक्तातील साखर संतुलित ठेवते
उपवास तोडताना खजूर खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी हळूहळू वाढते, अचानक वाढत नाही.
१०) शरीरातील पाणी संतुलित ठेवते
खजूरमध्ये पोटॅशियम असते, जे शरीरातील पाण्याचे प्रमाण व इलेक्ट्रोलाइट्स संतुलित ठेवते.
अधिक वाचा: संगिता ताईंनी बाराशे रुपयांच्या कर्जातून सुरू केलेला सुकामेवा व्यवसाय आज करतोय २५ लाखांची उलाढाल