Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > राज्यात जिल्हानिहाय रॉकेल वाटपाचा कोटा ठरला; कधीपासून आणि कशी होणार रॉकेल वाटप?

राज्यात जिल्हानिहाय रॉकेल वाटपाचा कोटा ठरला; कधीपासून आणि कशी होणार रॉकेल वाटप?

District-wise kerosene distribution quota has been decided in the state; from when and how will kerosene be distributed? | राज्यात जिल्हानिहाय रॉकेल वाटपाचा कोटा ठरला; कधीपासून आणि कशी होणार रॉकेल वाटप?

राज्यात जिल्हानिहाय रॉकेल वाटपाचा कोटा ठरला; कधीपासून आणि कशी होणार रॉकेल वाटप?

rockel vatap राज्य सरकारने युद्धजन्य परिस्थितीत गॅस सिलिंडरला पर्याय म्हणून रॉकेलचे वितरण करण्याचे ठरविले असून, जिल्हानिहाय रॉकेलचा कोटा निश्चित केला आहे.

rockel vatap राज्य सरकारने युद्धजन्य परिस्थितीत गॅस सिलिंडरला पर्याय म्हणून रॉकेलचे वितरण करण्याचे ठरविले असून, जिल्हानिहाय रॉकेलचा कोटा निश्चित केला आहे.

पुणे: राज्य सरकारने युद्धजन्य परिस्थितीत गॅस सिलिंडरला पर्याय म्हणून रॉकेलचे वितरण करण्याचे ठरविले असून, जिल्हानिहाय रॉकेलचा कोटा निश्चित केला आहे. यातून पुणे, मुंबई व नागपूर शहरांना वगळण्यात आले आहे.

अंत्योदय आणि प्राधान्य योजनेतील शिधापत्रिकांना रॉकेलचा पुरवठा करण्यात येणार असून, प्रतिशिधापत्रिका तीन लिटर रॉकेल मिळणार आहे.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक जिल्ह्याला रॉकेलचा सर्वाधिक कोटा देण्यात आला आहे. पुढील महिन्यात या रॉकेलचे शिधापत्रिकांवरून वितरण केले जाणार आहे.

केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी ३७ लाख ४४ हजार लिटर रॉकेलचे वितरण करण्याचे ठरविले आहे. या वितरणात अंत्योदय व प्राधान्य योजनेतील शिधापत्रिकाधारकांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

मात्र, रॉकेल विक्रीला मिळणारा प्रतिसाद तसेच उपलब्धता लक्षात घेऊन श्वेतपत्रिकाधारकांनादेखील वितरण होईल, यासाठी ग्रामपंचायत रहिवासी दाखला पुराता ग्राह्य धरण्यात यावा, असे निर्देश राज्य सरकारने दिले.

रॉकेलच्या उपलब्धतेनुसार स्थलांतरित मजूर देखील पात्र राहतील. शिधापत्रिकेला महिन्याला तीन लिटर रॉकेल मिळणार आहे. हे वितरण मार्च एप्रिल या महिन्यात होणार आहे.

दुकानदार, तसेच परवानाधारकांना वितरणाच्या दिनांकापासून ४५ दिवसांच्या आत संपूर्ण उचल करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. न उचललेल्या रॉकेलचे पुढील महिन्यात हस्तांतरण होणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दुकानदार तसेच परवानाधारकांना देताना एकूण वाटपाच्या कमाल ८५ टक्के रॉकेल पहिल्या पंधरवड्यात, तर उर्वरित पंधरा टक्के वाटप दुसऱ्या पंधरवड्यात दिले जाणार आहे.

जिल्हानिहाय रॉकेल (लिटरमध्ये)
अहिल्यानगर - २,१६,०००
अकोला - ७२,०००
अमरावती - १,०८,०००
बीड - १,२०,०००
भंडारा - ६,०००
बुलढाणा - १,३२,०००
चंद्रपूर - ९६,०००
संभाजीनगर - १,४४,०००
धाराशिव - ८४,०००
धुळे - ७२,०००
गडचिरोली - ४८,०००
गोंदिया - ६,०००
हिंगोली - ६०,०००
जळगाव - १,५६,०००
जालना - १,०८,०००
कोल्हापूर - १,५६,०००
लातूर - १,०८,०००
नागपूर जिल्हा - १,२०,०००
नांदेड - १,५६,०००
नंदुरबार - ६०,०००
नाशिक - २,२८,०००
पालघर - ८४,०००
परभणी - ७२,०००
पुणे - २,०४,०००
रायगड - १,२०,०००
रत्नागिरी - ८४,०००
सांगली - १,३२,०००
सातारा - १,४४,०००
सिंधुदुर्ग - ६,०००
सोलापूर जि. - १,३२,०००
सोलापूर शहर - १२,०००
ठाणे जिल्हा - ४८,०००
वर्धा - ७२,०००
वाशिम - ७२,०००
यवतमाळ - १,४४,०००

गैरवापर नजर ठेवण्यासाठी निरीक्षण पथक
◼️ एखाद्या गावात रॉकेल विक्रेता उपलब्ध नसल्यास शेजारील गावातून रॉकेल उपलब्ध करून द्यावे, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
◼️ रॉकेलचे हे वितरण तात्पुरत्या स्वरूपाचे असून मागणी उचल या बाबींचा विचार करून त्यात सुधारणा करण्यात येणार असल्याचेही राज्य सस्कारने स्पष्ट केले आहे.
◼️ रॉकेलच्या गैरवापर नजर ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर संयुक्त निरीक्षण पथक स्थापन करून त्यात तहसीलदार, पुरवठा अधिकारी, तसेच पोलिसांचा समावेश करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
◼️ जिल्हानिहाय कोटा ठरवण्यासाठी पुरवठा विभागाने शिधापत्रिकाधारकांची संख्या मागवली होती. त्यानुसार कोटा निश्चित करण्याला करण्यात आला आहे.
◼️ अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक जिल्ह्याला २ लाख २८ लाख लिटर, तर अहिल्यानगर जिल्ह्याला २ लाख १६ हजार लिटर व पुणे जिल्ह्याला २ लाख ४ हजार रकिल मिळणार आहे.

अधिक वाचा: राज्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणे होणार आता नियमित; वाचा कुणाकुणाला कसा होणार फायदा?

Web Title: District-wise kerosene distribution quota has been decided in the state; from when and how will kerosene be distributed?