Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > घातक केमिकलने आंबा पिकवाल तर होणार थेट फौजदारी कारवाई; अन्न सुरक्षा आयुक्तांचे आदेश

घातक केमिकलने आंबा पिकवाल तर होणार थेट फौजदारी कारवाई; अन्न सुरक्षा आयुक्तांचे आदेश

Direct criminal action will be taken if mangoes are grown with hazardous chemicals; Food Safety Commissioner orders | घातक केमिकलने आंबा पिकवाल तर होणार थेट फौजदारी कारवाई; अन्न सुरक्षा आयुक्तांचे आदेश

घातक केमिकलने आंबा पिकवाल तर होणार थेट फौजदारी कारवाई; अन्न सुरक्षा आयुक्तांचे आदेश

उन्हाळ्यात आंब्यासह विविध फळांची आवक वाढत आहे. मात्र, फळे पिकवण्यासाठी घातक रसायनांचा वापर वाढला आहे. यावर एफएसएसएआयने कडक पाऊल उचलले आहे.

उन्हाळ्यात आंब्यासह विविध फळांची आवक वाढत आहे. मात्र, फळे पिकवण्यासाठी घातक रसायनांचा वापर वाढला आहे. यावर एफएसएसएआयने कडक पाऊल उचलले आहे.

उन्हाळ्यात आंब्यासह विविध फळांची आवक वाढत आहे. मात्र, फळे पिकवण्यासाठी घातक रसायनांचा वापर वाढला आहे. यावर FSSAI एफएसएसएआयने कडक पाऊल उचलले आहे.

फळे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईड वापरणे हा कायद्याने गुन्हा असून, असा प्रकार आढळल्यास थेट फौजदारी कारवाई करण्याचे आदेश अन्न सुरक्षा आयुक्तांना देण्यात आले आहेत.

फळे पिकवण्यासाठी घातक रसायनांचा वापर हा गंभीर गुन्हा आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर फौजदारी कारवाई केली जाईल, असे अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

सध्या हापूस आंब्याचे दर दोन ते तीन हजार रुपये प्रति पेटीपर्यंत पोहोचले आहेत. केशर आंबाही महाग असून सर्वसामान्य ग्राहकांना फळे खरेदी करताना आर्थिक ताण जाणवत आहे.

आंब्यासोबतच केळी, पपई आणि चिकू यांसारख्या फळांनाही जलद पिकवण्यासाठी इथेफॉनसारख्या रसायनांचा वापर होत असल्याचे आढळले आहे.

फळे पिकवण्यासाठी या रसायनांचा वापर
कॅल्शियम कार्बाईड, इथिलीन आणि इथिफोन यांसारखी रसायने फळे कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी वापरली जातात. या प्रक्रियेमुळे फळे बाहेरून पिवळी दिसतात, पण आतून कच्ची राहतात.

संबंधितांवर एफआरआय दाखल करण्याचे आदेश
एफएसएसएआय अन्न सुरक्षा आयुक्तांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. कॅल्शियम कार्बाईडचा वापर आढळल्यास संबंधितांवर एफआरआय दाखल करून फौजदारी कारवाई करण्यात यावी, असे सांगण्यात आले.

प्रकृतीला धोके काय?
◼️ कर्करोगाचा धोका.
◼️ पोटाचे विकार, उलट्या-जुलाब.
◼️ त्वचा व डोळ्यांची जळजळ.
◼️ मज्जासंस्थेवर परिणाम.
◼️ यकृत व मूत्रपिंडाचे नुकसान.

फळबाजार, गोदामांची तपासणी होणार
◼️ राज्यभरातील फळबाजार आणि गोदामांवर अचानक छापे टाकून तपासणी केली जाणार आहे.
◼️ कृत्रिम पिकवणी रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

केमिकलने पिकवलेली फळे कशी ओळखायची?
◼️ एकसारखा चमकदार पिवळा रंग.
◼️ केळी पिवळी पण देठ हिरवा पाण्यात टाकल्यास फळ तरंगते चव बेचव.
◼️ रसायनाचा वास कापल्यावर आतून कच्चे दिसते.

फळे खाण्याआधी अशी करा स्वच्छ
◼️ वाहत्या पाण्याखाली नीट धुवा.
◼️ व्हिनेगर व मिठाच्या पाण्यात भिजवा बेकिंग सोड्याच्या पाण्याचा वापर करा.
◼️ कापण्यापूर्वी फळे धुवा.

इथेफॉनसारख्या रसायनांचा वापर होतोय
आंब्यासोबतच केळी, पपई आणि चिकू यांसारख्या फळांनाही जलद पिकवण्यासाठी इथेफॉनसारख्या रसायनांचा वापर होत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे.

अधिक वाचा: आता सातबाऱ्यावर नको तलाठ्याचा सही-शिक्का; १५ रुपयांतच 'इथे' मिळणार डिजिटल सहीचा सातबारा

Web Title : घातक रसायन से आम पकाने पर होगी आपराधिक कार्रवाई: आदेश जारी

Web Summary : कैल्शियम कार्बाइड जैसे रसायनों का उपयोग करके फलों को पकाना गैरकानूनी है। खाद्य सुरक्षा आयुक्तों ने सख्त कार्रवाई का आदेश दिया। उल्लंघन करने वालों पर आपराधिक आरोप लगने का खतरा है। अधिकारी बाजारों और गोदामों का निरीक्षण करेंगे। अप्राकृतिक रूप से रंगीन या स्वाद वाले फलों से सावधान रहें। सेवन से पहले फलों को अच्छी तरह धो लें।

Web Title : Criminal Action for Artificially Ripening Mangoes with Chemicals: Order Issued

Web Summary : Using chemicals like calcium carbide to ripen fruits is illegal. Food Safety Commissioners order strict action. Violators risk criminal charges. Authorities will inspect markets and warehouses. Be cautious of unnaturally colored or flavored fruits. Wash fruits thoroughly before consumption.