Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > राज्यात डिजिटल जनगणना सुरु; आता तुमच्या मोबाईलवरच करता येणार स्व-गणना, जाणून घ्या सविस्तर

राज्यात डिजिटल जनगणना सुरु; आता तुमच्या मोबाईलवरच करता येणार स्व-गणना, जाणून घ्या सविस्तर

Digital census begins in the state; Now you can do self-census on your mobile, know the details | राज्यात डिजिटल जनगणना सुरु; आता तुमच्या मोबाईलवरच करता येणार स्व-गणना, जाणून घ्या सविस्तर

राज्यात डिजिटल जनगणना सुरु; आता तुमच्या मोबाईलवरच करता येणार स्व-गणना, जाणून घ्या सविस्तर

jan ganana 2026 राज्यात १ मेपासून राष्ट्रीय जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होत असून, यावेळी प्रथमच 'स्व-गणना'चा पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

jan ganana 2026 राज्यात १ मेपासून राष्ट्रीय जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होत असून, यावेळी प्रथमच 'स्व-गणना'चा पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

राज्यात १ मेपासून राष्ट्रीय जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होत असून, यावेळी प्रथमच 'स्व-गणना'चा पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

हा टप्पा ऐच्छिक असणार असून १ मे ते १५ मे या कालावधीत नागरिकांना अधिकृत संकेतस्थळावरून स्वतःच्या कुटुंबाची माहिती ऑनलाइन भरता येणार आहे.

राज्याच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी गुरुवारी ही माहिती दिली. देशातील ही पहिली पूर्णतः डिजिटल जनगणना ठरणार असून नागरिकांच्या सहभागाला यामध्ये विशेष महत्त्व देण्यात आले आहे.

प्रक्रिया यशस्वी जनगणना होण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

स्व-गणना कशी कराल?
◼️ संकेतस्थळ : se.census.gov.in
◼️ एका कुटुंबासाठी एकच अर्ज
◼️ एकूण ३३ प्रश्नांची माहिती भरावी लागेल. ती अचूक भरा.
◼️ कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही
◼️ माहिती पूर्ण भरल्यावर तुम्हाला ११ अंकी युनिक आयडी मिळेल.
◼️ हा आयडी पुढील पडताळणीसाठी जतन करून ठेवणे आवश्यक.

घरगणना' कधी?
◼️ १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत जनगणना अधिकारी घरोघरी जाऊन 'घरगणना' करतील.
◼️ स्व-गणना केली आहे, त्यांच्या माहितीची पडताळणी केली जाईल.
◼️ यावेळी युनिक आयडी दाखवणे आवश्यक असेल.
◼️ तर स्व-गणना न केलेल्या नागरिकांची माहिती अधिकारी स्वतः भरून घेतील.

घ्या ही काळजी
अधिकृत संकेतस्थळावरच माहिती भरा संशयास्पद लिंक किंवा संदेश टाळा एसएमएस/ई-मेलचा स्रोत तपासा वैयक्तिक कागदपत्रे अपलोड करू नका.

अधिक वाचा: इथेनॉल निर्मितीमुळे येऊ शकतो दुष्काळ; वाचा १ लिटर इथेनॉल बनविण्यासाठी लागतंय किती पाणी?

Web Title : महाराष्ट्र में डिजिटल जनगणना शुरू; अब मोबाइल पर स्वयं गणना

Web Summary : महाराष्ट्र में 1 मई से डिजिटल जनगणना शुरू। नागरिक 15 मई तक ऑनलाइन (se.census.gov.in) स्वयं गणना कर सकते हैं। घर-घर गणना (16 मई-14 जून, 2026) के दौरान सत्यापन के लिए यूनिक आईडी जरूरी। सटीक जानकारी दें और संदिग्ध लिंक से बचें।

Web Title : Digital Census Begins in Maharashtra; Self-Enumeration on Your Mobile

Web Summary : Maharashtra starts digital census May 1st. Citizens can self-enumerate online (se.census.gov.in) until May 15th. Unique ID needed for verification during house-to-house enumeration (May 16-June 14, 2026). Provide accurate information and avoid suspicious links.