बालाजी थेटे
अतिवृष्टी, पुराच्या पाण्यामुळे खरिपाचे अतोनात नुकसान झाले. त्यातून शिल्लक राहिलेले सोयाबीन काढणीसाठी तगरखेडचातील एका शेतकऱ्याने तयारी केली. मात्र, काढणीसाठीचा खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ लागणार नसल्याचे पाहून शेतातील सोयाबीन पीक पेटवून दिल्याची घटना शनिवारी (दि.१८) ऑक्टोबर रोजी घडली.
लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील तगरखेडा येथील शेतकरी बालाजी सूर्यकांत गुते यांना तेरणा-मांजरा नदीकाठावर तीन एकर शेती आहे. पुराचे पाणी कमी इशल्यानंतर बालाजी गुप्ते यांनी शिल्लक राहिलेल्या सोयाबीनची काढणी पत्नी व मुलाला सोबत घेऊन केली; परंतु काढणीचा खर्चही परवडणार नसल्यामुळे पीक पेटवून दिले.
संसाराचा गाडा कसा हाकायचा ?
शासनाकडून खात्यावर १० हजार २०० रुपयांचे अनुदान जमा झाले. खरिपासाठी ७० हजारांचे कर्ज आहे. सोयाबीन लागवडीसाठीचा खर्च कसा भरून काढायचा आणि कुटुंबाचा गाडा कसा हाकायचा, अशा यक्षप्रश्नाने हताश झालेल्या बालाजी गुत्ते यांनी सोयाबीन पेटवून दिले.
पत्नी व मुलाला नुकसानीतून बचावलेले सोयाबीन काढले; परंतु राशीसाठी खर्च वाढला आहे. आता लागवडीचा खर्चही निघत नसल्याचे पाहून पीक पेटवून दिले. - बालाजी गुत्ते, शेतकरी.
गंगाखेड तालुक्यातही गंजी पेटवून देऊन संताप
गंगाखेड (जि. परभणी) : अगोदरच निसर्गाच्या अवकृपेने हाती आलेल्या सोयाबीनचे नुकसान झाले. त्यात हाती आलेल्या सोयाबीनला शासनाच्या सुलतानी वृत्तीमुळे हमीभाव मिळेना.
अशा दुहेरी संकटात सापडलेल्या गंगाखेड तालुक्यातील जवळा (रुमणा) येथील एका शेतकऱ्याने शुक्रवारी सायंकाळी उद्विग्न होऊन शेतातील सोयाबीनच्या गंर्जीना चक्क पेटवून देत आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.
हमीभावाने खरेदीही नाही
• अतिवृष्टीने बळीराजाच्या हातातील सोयाबीन पीक उद्ध्वस्त केल्यानंतर शिल्लक सोयाबीन सांभाळून ठेवण्यासाठी जिवाचे रान केलेल्या शेतकऱ्यांना सोयाबीन हमीभावाने खरेदी होत नसल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
• अशाच परिस्थितीतून शुक्रवारी सायंकाळी परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातील जवळा (रूमणा) येथील शेतकरी नाथराव दत्तराव कदम यांनी आपल्या शेतात काढणी करून ढीग केलेल्या सोयाबीनच्या गंजीला चक्क पेटवून देत संताप व्यक्त केला.
• यामध्ये साधारणतः दोन लाख रुपयांचे सोयाबीन जळून खाक झाल्याची माहिती आहे. दरम्यान, शासनाने आतातरी जागे होत हमीभाव खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांच्या पिकांना भाव द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.