पोर्ले तर्फ ठाणे : आसुर्ले-पोर्ले येथील दत्त दालमिया भारत शुगर कारखान्याने यंदा गाळपास आलेल्या उसाचा प्रतिटन ३६३४ रुपये ८३ पैसे प्रमाणे ऊसबिल विनाकपात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती युनिट हेड संतोष कुंभार यांनी दिली.
एफआरपी जाहीर केल्यानंतर पहिल्या पंधरावड्यात तुटलेल्या उसाचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणारा जिल्ह्यातील पहिला दालमिया साखर कारखाना आहे.
दालमिया कंपनी घेत असलेल्या धोरणांचा आढावा कुंभार यांनी घेतला. यावेळी जनरल मॅनेजर (केन) श्रीधर गोसावी, एचआर प्रमुख सुहास गुडाळे, मॅनेजर (केन) शिवप्रसाद देसाई, किशोर लेंगरे, आदी उपस्थित होते.
अधिक वाचा: राज्यातील 'या' ३८ साखर कारखान्यांनी मागील वर्षीच्या साखर हंगामात थकवली १४० कोटी एफआरपी
