जास्त टीडीएस असलेले पाणी आणि अत्यंत कमी टीडीएस असलेले पाणी दोन्ही मानवी आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात.
जास्त टीडीएस म्हणजे पाण्यात जास्त खनिजे आणि इतर पदार्थ, तर कमी टीडीएस म्हणजे पाण्याचे शुद्धीकरण जास्त. पिण्याच्या पाण्याचे टीडीएस योग्य असणे आवश्यक आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार पिण्याच्या पाण्यात १०० मिलीग्राम/लिटरपेक्षा जास्त टीडीएस असणे आवश्यक आहे आणि ३०० मिलीग्राम/लिटरपेक्षा जास्त टीडीएस हानिकारक मानले जाते.
पिण्याच्या पाण्याचे टीडीएस योग्य असणे आवश्यक आहे. सतत कमी टीडीएसचे पाणी पिल्यास हाडे ठिसूळ अन् सांध्यांचाही आजार बळावतो.
अल्कलायनिटी जास्त; उलट्या, अस्वस्थता
अल्कलिनिटी जास्त असल्यास, म्हणजे रक्तातील आम्लता कमी झाल्यास, उलट्या आणि अस्वस्थता यांसारखी लक्षणे दिसू शकतात. रक्तातील क्लोराइड आणि हायड्रोजन आयन कमी झाल्यास प्रकृतीत बिघाड येतो.
विहीर, बोअरच्या पाण्यात ६०० पर्यंत टीडीएस
विहीर किंवा बोअरवेलच्या पाण्यात ६०० पर्यंत टीडीएस असणे हे सामान्य आहे, विशेषतः बोअरवेलच्या बाबतीत. टीडीएस म्हणजे पाण्यात विरघळलेल्या खनिजांची आणि इतर पदार्थांची पातळी. ३००-६०० पीपीएम टीडीएसची पातळी चांगली मानली जाते, तर डब्ल्यूएचओच्या मते चवीसाठी टीडीएस ६०० पीपीएमपेक्षा कमी असला पाहिजे.
जास्त टीडीएसचे पाणी पिण्याचे धोके काय ?
जास्त टीडीएसचा अर्थ पाण्यात जास्त प्रमाणात खनिजे, मीठ विरघळलेले असतात. जास्त टीडीएस असलेले पाणी पिल्यामुळे पोट खराब होऊ शकते, मळमळ येऊ शकते किंवा त्वचेवर पुरळ येऊ शकतात.
किती टीडीएसचे पाणी पिण्यासाठी सर्वोत्तम ?
भारतीय मानक ब्युरोनुसार, पाण्यातील टीडीएस पातळीची वरची मर्यादा ५०० पीपीएम आहे. डब्ल्यूएचओने शिफारस केलेली टीडीएस पातळी मात्र ३०० पीपीएम आहे.
जारच्या पाण्यात किती टीडीएस असतात ?
जारच्या पाण्याचे टीडीएस ३० ते ६० मिलिग्राम प्रतिलिटरपर्यंत असू शकतात. काही ठिकाणी जारच्या पाण्याचे टीडीएस ३० मिलिग्रामपर्यंतही आढळले, तर नळाच्या पाण्याचे टीडीएस ३७० मिलिग्रामपर्यंत होते.
कमी टीडीएसचे पाणी पिण्याचे धोके काय ?
• कमी टीडीएस असलेल्या पाण्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारखी आवश्यक खनिजे कमी असतात, ज्यामुळे शरीरात त्यांची कमतरता येऊ शकते. कमी टीडीएसमुळे बद्धकोष्ठता आणि इरिटेबल बोवेल सिंड्रोमसारख्या पचन समस्या येऊ शकतात.
• कमी टीडीएस असलेले पाणी पाईप्स आणि स्टोरेज सिस्टममधून अधिक दूषित पदार्थ शोषून घेते, ज्यामुळे दूषित होण्याचा धोका वाढतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.
हेही वाचा : फवारणीपूर्वी तपासा पाण्याचा सामू; पीएच बरोबर नसेल तर महागडी फवारणी सुद्धा जाईल फेल