Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल बांधताय? आता 'असे' मिळणार चार हप्त्यांत अनुदान

प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल बांधताय? आता 'असे' मिळणार चार हप्त्यांत अनुदान

Building a house under the Pradhan Mantri Awas Yojana? Now you will get the subsidy in four installments | प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल बांधताय? आता 'असे' मिळणार चार हप्त्यांत अनुदान

प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल बांधताय? आता 'असे' मिळणार चार हप्त्यांत अनुदान

gharkul yojana anudan hapta प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल बांधताना लाभार्थ्यांना चार टप्प्यात पैसे मिळतात. घरकुल योजनेचे हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ऑनलाईन जमा होत असतात.

gharkul yojana anudan hapta प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल बांधताना लाभार्थ्यांना चार टप्प्यात पैसे मिळतात. घरकुल योजनेचे हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ऑनलाईन जमा होत असतात.

शासनाच्या वतीने पक्के घर नसणाऱ्यांसाठी विविध घरकुल योजना असतात. त्यामुळे २०२४-२५ आणि २५-२६ या वर्षात प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना ग्रामीण टप्पा दोन योजनेंतर्गत बऱ्याच घरकुलांना मंजुरी मिळालेली आहे.

त्यातील काही घरकुलांचे कामही पूर्ण झालेले आहे. तर काही घरे घरे अपूर्ण आहेत. तर पात्र लाभार्थ्यांना जागा नसल्यास शासनाकडून खरेदीसाठी पैसेही मिळतात.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागासाठी आहे. या योजनेतून पात्र लाभार्थ्यांना घरकूल मिळते. या योजनेतून घरकूल मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्यांनी २६९ चौरस फूट बांधकाम करणे अपेक्षित असते.

यासाठी केंद्र शासनाकडून १ लाख २० हजार रुपये अनुदान मिळते. तसेच घराचे अधिक काम झाले तर त्याचा खर्च हा लाभार्थ्यालाच करावा लागतो.

त्याचबरोबर शौचालयासाठी वेगळे पैसे मिळतात. स्वच्छ भारत मिशनमधून त्यांचा निधी मिळतो. प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल बांधताना लाभार्थ्यांना चार टप्प्यात पैसे मिळतात.

घरकुल योजनेचे हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ऑनलाईन जमा होत असतात. त्यामुळे लाभार्थ्यांना अनुदानासाठी हेलपाटे मारावे लागत नाहीत. यामुळे घरकुल पूर्ण होण्यास विलंब होत नाही.

चार हप्त्यांत असे मिळते अनुदान
◼️ पहिला हप्ता :
घरकूल मंजूर झाल्यानंतर १५ हजार रुपये.
◼️ दुसरा हप्ता : घरकुलाचे फाऊंडेशन पूर्ण झाल्यानंतर ७० हजार रुपये बँक खात्यावर जमा.
◼️ तिसरा हप्ता : घराचे काम पत्रा टाकण्याच्या स्थितीत आल्यानंतर ३० हजार रुपये.
◼️ चौथा हप्ता : घरकुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर ५ हजार रुपये.

घराच्या जागेसाठीही मिळतात पैसे
◼️ घरकुलाचा लाभ घेताना काही लाभार्थी हे भूमिहीन असतात.
◼️ त्यांना घरकूल मंजूर झाले तरी बांधण्यासाठी जागा नसते.
◼️ यासाठी शासनाच्यावतीने घरकुलासाठी अर्धा गुंठा जागा खरेदीसाठी एक लाखापर्यंत अनुदान देण्यात येते.
◼️ यामुळे संबंधित पात्र लाभार्थ्यांचे घरकुल बांधणीचे स्वप्न साकार होते.

अधिक वाचा: बदललेल्या शक्तीपीठ महामार्गामुळे 'या' ३४ गावांतील जमिनीच्या किमतीत दुपटीने वाढ; एकरी काय दर?

Web Title: Building a house under the Pradhan Mantri Awas Yojana? Now you will get the subsidy in four installments