Fresh Khajur Fruit पावसाळा सुरू होताच बाजारपेठांमध्ये ओल्या खजुराची चविष्ट आणि ताजीतवानी झळाळी दिसू लागते. याच दिवसांत त्यांची आवक वाढते आणि भावही उतरतात.
लाल व पिवळ्या रंगाचे खजूर फक्त गोडसर नाहीत, तर आरोग्यदायी देखील आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकासाठी पोषणतत्त्वांनी भरलेले हे खजूर 'निसर्गाची व्हिटॅमिन कॅप्सूल' मानले जातात.
नैसर्गिक गोडवा; मेंदूचे कार्य सुधारते
ओल्या खजुरातील नैसर्गिक साखर मेंदूसाठी इंधनासारखे काम करते. यात असलेले ग्लुकोज व फ्रक्टोज मेंदूच्या कार्यक्षमतेत वाढ करतात. थकवा, दुर्बलता यावर त्वरित ऊर्जा देणारे हे खजूर नैसर्गिक 'एनर्जी बूस्टर' ठरतात.
लहान-मोठ्यांसाठी पोषणतत्त्वांचा खजिना
ओल्या खजुरामध्ये आयर्न, पोटॅशियम, फायबर, अँटीऑक्सिडंट्स, बी-कॉम्प्लेक्स अशी अनेक पोषणद्रव्ये असतात. त्यामुळे हे खजूर रोगप्रतिकारशक्ती वाढवतात, थकवा दूर करतात आणि पचनक्रिया सुधारतात लहान मुलांचे वजन वाढवण्यासाठीही हे उपयुक्त असतात.
हाडे मजबूत होतात
ओल्या खजुरात असलेले कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस हे घटक हाडांची घनता वाढवतात. सांधेदुखी व ऑस्टिओपोरोसिससारख्या समस्यांपासून संरक्षण मिळते. वयोवृद्धांसाठी ही अत्यंत उपयुक्त फळे आहेत.
ओल्या खजुराचा भाव काय?
लाल खजूर : १०० ते १२० रुपये किलो.
पिवळा खजूर : ८० ते १०० रुपये किलो.
ओल्या खजुरापासून काय बनवाल?
खजूर शेक (खजूर, दूध व साखर न घालता) ओल्या खजुराची चटणी, खजूर खीर, लाडू वा रोल्स (ड्रायफ्रुट्ससह) नाश्त्यात थेट फळासारखा उपयोग इत्यादी.
ओले खजूर हे निसर्गदत्त सुपरफूड आहे. हे दररोजच्या आहारात समाविष्ट केल्यास शरीरातील सूज, अशक्तपणा, थकवा कमी होतो. गरम पदार्थांसोबत खाल्ल्यास पचन सुलभ होते असे आहारतज्ज्ञ सांगतात. ह्या फळाचे सेवन करताना आहारतज्ज्ञ यांचा सल्ला घ्यावा.
अधिक वाचा: Ranbhajya: पावसाळ्यात रानभाज्यांची जादू; चवीबरोबरच 'या' रानभाज्यांचा आरोग्यालाही मोठा फायदा