Awala : बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात आवळा विक्री होताना दिसत आहे. हायब्रीड व गावरान, असे दोन्ही प्रकारचे आवळे आले आहेत. या दोन्ही प्रकारच्या आवळ्याच्या गुणधर्मांत फरक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
आवळा ८० ते १२० रुपये किलो सध्या बाजारात ८० ते १२० रुपये किलो या दराने आवळ्याची विक्री होत आहे. लहान आकाराचा आवळा हा ८० रुपये आणि मोठ्या आकाराचे आवळे १२० रुपये किलो या दराने विक्री होत आहे.
लोणचे, कँडी, मुरंब्याने बरण्या भरणार
* आवळ्यापासून लोणचे, कँडी, मुरंबा करण्याकडे अनेकांचा कल आहे. त्यासाठी आवळा खरेदी करण्यासाठी बाजारात येणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
* गृहोद्योग, बचत गट, गृहिणींकडून जास्त खरेदी होत असल्याचे दिसते.
हायब्रीड व गावरान आवळ्यात फरक काय?
• गावरान आवळा हा आकाराने लहान असतो आणि बऱ्याच वेळा तो थोडासा टोकाकडील भागाकडे चॉकलेटी शेडमध्ये देखील मिळू शकतो.
• संकरित आवळा हा आकाराने अतिशय मोठा असतो. गावरान आवळ्याची मूळ चव ही तुरट आणि आंबट या दोन्ही प्रकारांत असते. आवळा खाऊन पाणी प्यायल्यानंतर ते गोडसर लागते.
केस, त्वचा चमकते; पचनशक्ती सुधारते
* आवळ्यामुळे ॲसिडिटी वाढत नाही, पचनसंस्था सुधारते. भुकेची जाणीव होते.
* अन्नपचनास मदत होते. युरिक ॲसिडची पातळी नियंत्रणात राहते.
* लठ्ठपणा असलेल्या व्यक्तींसाठी आवळा हा अतिशय गुणकारी आहे.
* यामध्ये असणारे फायबर्स आणि 'जीवनसत्त्व क' मुळे रक्तवाहिन्यांचा व्यास वाढून चरबी कमी होते. आणि लठ्ठपणा कमी व्हायला मदत होते.
* पचनसंस्थेवर चांगला परिणाम होतो. 'जीवनसत्त्व कमुळे त्वचेचे पोषण चांगले होते. त्वचा चमकते.
रोज एक आवळा खाणे फायदेशीर
रोज प्रतिव्यक्ती एक आवळा पोटात जाणे गरजेचे आहे. सकाळी उपाशीपोटी जर आवळा घेतला तर त्याचा सगळ्यात चांगला परिणाम होऊ शकतो. हळद लावून भाजलेला आवळा खाणे सगळ्यात जास्त पौष्टिक आहे. आवळ्याचे पदार्थ चघळून खाल्ल्यास पचनसंस्थेवर अतिशय चांगला परिणाम होतो. - अलका कर्णिक, आहारतज्ज्ञ
हे ही वाचा सविस्तर : Women Farmer : डॉक्टर महिलेने केले शेतीचे नंदनवन वाचा सविस्तर