Lokmat Agro >शेतशिवार > Awakali Paus: जालन्यातील पिके मातीमोल; तातडीने पंचनामे करण्याचे आदेश वाचा सविस्तर

Awakali Paus: जालन्यातील पिके मातीमोल; तातडीने पंचनामे करण्याचे आदेश वाचा सविस्तर

Awakali Paus: latest news Crops in Jalna are worthless; Read the order to conduct immediate Panchnama in detail | Awakali Paus: जालन्यातील पिके मातीमोल; तातडीने पंचनामे करण्याचे आदेश वाचा सविस्तर

Awakali Paus: जालन्यातील पिके मातीमोल; तातडीने पंचनामे करण्याचे आदेश वाचा सविस्तर

Awakali Paus : मागील दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे जालना जिल्ह्यात १८४ गावांतील २,६३८ शेतकरी बाधित झाले असून, २,००० हेक्टरहून अधिक क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. (Awakali Paus)

Awakali Paus : मागील दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे जालना जिल्ह्यात १८४ गावांतील २,६३८ शेतकरी बाधित झाले असून, २,००० हेक्टरहून अधिक क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. (Awakali Paus)

शेअर :

Join us
Join usNext

Awakali Paus : मागील दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे जालना जिल्ह्यात १८४ गावांतील २,६३८ शेतकरी बाधित झाले असून, २,००० हेक्टरहून अधिक क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. (Awakali Paus)

तालुका स्तरावर सर्वाधिक बदनापूर तालुक्यात १,२३२ हेक्टरवर नुकसान झाले असून, यामध्ये फळबागा व बागायती शेती यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. प्रशासनाने तत्काळ पंचनामे सुरू केले आहेत.  (Awakali Paus)

मागील दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे जालना (Jalana) जिल्ह्यातील शेतीचे नुकसान झाले आहे. शासनाने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनास दिले होते. यानुसार, जिल्ह्यातील २ हजार ३८ शेतकऱ्यांचे १ हजार ९२३ हेक्टर्सवरील शेतीचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाकडे प्राप्त झालेला आहे.  (Awakali Paus)

नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनातील कर्मचाऱ्यांकडून सुरू करण्यात आलेले आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर, जालना व परतूर तालुक्यात नुकसान झालेले आहे. इतर जिल्ह्यांत नुकसान झाले नसल्याचे प्राथमिक अहवालानुसार दिसून येत आहे.  (Awakali Paus)

५ आणि ६ मे रोजी जिल्ह्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यानंतर प्रशासनाने पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली. जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करण्याचे आदेश प्रशासनास दिले होते. यानुसार, तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांकडून नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.  (Awakali Paus)

प्राथमिक अहवाल सादर

* ५ आणि ६ मे रोजी झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांकडून प्रशासनास सादर करण्यात आलेला आहे.

* यानंतर प्रशासनाकडून नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे.

* परतूर तालुक्यातील फळबागांचे मोठे नुकसान झालेले असल्याचे दिसून येत आहे. येथे केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

१८४ गावांतील शेतकरी बाधित

प्राथमिक अहवालानुसार, जिल्ह्यातील १८४ गावांमध्ये नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. यात ९८ गावे परतूर तालुक्यातील आहेत. तर ६५ गावे जालना व २१ गावे बदनापूर तालुक्यातील आहेत.

सर्वाधिक नुकसान बदनापूर तालुक्यात

* अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालात दिसत आहे. या तालुक्यात १,२३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

* यात ४४७ हेक्टरवरील बागायती शेती व ७८४ फळबागांचे नुकसान झालेले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. या तालुक्यातील १ हजार ९११ शेतकऱ्यांच्या पिकांचे अवकाळीमुळे नुकसान झालेले असल्याची शक्यता आहे.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा तपशील (प्राथमिक अहवालानुसार)

तालुकाबाधित गावे (संख्या)बाधित शेतकरी (संख्या)नुकसानग्रस्त शेती (हेक्टरमध्ये)
जालना६५६८४३८५
बदनापूर२११,९१११,२३२
परतूर९८४३३०६
एकूण१८४२,६३८१,९२३

हे ही वाचा सविस्तर : Awakali Paus: वादळी वाऱ्याचा तडाखा : शेकडो एकर केळी बागा झाल्या उद्ध्वस्त वाचा सविस्तर

Web Title: Awakali Paus: latest news Crops in Jalna are worthless; Read the order to conduct immediate Panchnama in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.