सोलापूर : जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेली अतिवृष्टी आणि महापुराचा फटका बसलेल्या बाधित शेतकऱ्यांना, मंजूर झालेल्या यादीप्रमाणे त्यांच्या खात्यात राज्य शासनाकडून ४११ कोटी ७३ लाख ८८ हजार ५९५ रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
महापुराचा फटका जिल्ह्यातील ७ लाख ६४ हजार १७३ शेतकऱ्यांना बसला आहे. नैसर्गिक संकटात ६ लाख ४ हजार ६४१ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.
झालेल्या नुकसानापोटी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी राज्य शासनाला ८६७कोटी ३७ लाख ६३ हजार ८५५ रुपयांचा प्रस्ताव पाठवला होता. अहवालातील संपूर्ण रक्कम शासनाने मंजूर केली आहे.
अतिवृष्टी व महापुरात २ लाख ५७हजार ५९२ हेक्टरवरील जिरायती पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये २ लाख ५६ हजार २४९ शेतकरी बाधित झाले आहेत.
२ लाख ४० हजार ७९४ बागायत हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, यामध्ये ३ लाख ७० हजार १८९ शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
फळपिकाखालील १ लाख ६ हजार २५३ हेक्टरला फटका बसला आहे, यामध्ये १ लाख ३७ हजार ७३५ शेतकरी बाधित झाले आहेत. जिल्ह्यातील ११ तालुक्यांच्या नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला होता.
नुकसानभरपाईची रक्कम (कोटींमध्ये)
तालुका | बाधित शेतकरी | मंजूर निधी
अक्कलकोट | ५९,०७६ | ४१,२८,५३,९०८
बार्शी | ९९.८९८ | ५५,१९,५५,८६२
करमाळा | ९१,४८० | ४४,८१,७६,३१०
माढा | ९८,३२८ | ४२,५८,२२,५०३
माळशिरस | ५४,५९९ | ३७,५९,२३,४ ३,४४१
मंगळवेढा | १९,७३० | ३२,५४,५०,०४०
मोहोळ | ७६,१८१ | २०,१८,६४,६४४
पंढरपूर | ९९,०४५ | ४१,१४,२५,६८०
सांगोला | ७२,८४५ | ६६,१५,४६,६०८
उत्तर सोलापूर | ८.९८८ | ४,८९,०१,७६७
दक्षिण सोलापूर | १४,०५० | १०,२२,१६,०४४
अपर मंद्रुप | ३०,०३३ | १५,०२,५१,७८९
अहवालानुसार शासनाने सर्वच रक्कम मंजूर केली आहे. पैसे बँकेत जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मंजूर असलेल्या नुकसान भरपाईपैकी ४११ कोटी ७३ लाखांचा निधी संबंधित पूरग्रस्तांच्या खात्यात दोन दिवसांमध्ये जमा होईल. टप्प्याटप्प्याने ८६७ कोटी ३७ लाख ६३ हजार ८५५ रुपयांची रक्कमही जमा होईल. - अभिजीत पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी
अधिक वाचा: पुढील पाच दिवस राज्यातील 'या' भागात वीजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडणार
