Lokmat Agro >शेतशिवार > एफआरपीनुसार उसाचा उर्वरीत २८० रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग

एफआरपीनुसार उसाचा उर्वरीत २८० रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग

As per FRP, the remaining installment of Rs 280 for sugarcane will be transferred to the bank account of the farmers | एफआरपीनुसार उसाचा उर्वरीत २८० रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग

एफआरपीनुसार उसाचा उर्वरीत २८० रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग

sugarcane frp 2024-25 दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये गाळप केलेल्या उसाची एफ.आर.पी. रु. ३०७९.१२ येत आहे.

sugarcane frp 2024-25 दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये गाळप केलेल्या उसाची एफ.आर.पी. रु. ३०७९.१२ येत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

अवसरी : दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये गाळप केलेल्या उसाची एफ.आर.पी. रु. ३०७९.१२ येत आहे.

प्रथम अॅडव्हान्स रु. २८००/- प्रती मे.टन वजा जाता उर्वरित रु. २८०/- प्रती मे.टनाप्रमाणे रक्कम रु. ३१ कोटी ८७ लाख ७८ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर (दि. ५ मे) वर्ग केली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना बाळासाहेब बेंडे म्हणाले की, मा. उच्च न्यायालय व शासनाचे निर्णयानुसार मागील हंगामाचा साखर उतारा गृहीत धरून मागील हंगामाचा ऊस तोडणी वाहतूक खर्च वजा करावयाचा आहे.

महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री व कारखान्याचे संस्थापक-संचालक दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मा. संचालक मंडळ सभेतील निर्णयानुसार हंगामाकरीता देय एफ.आर.पी. रु. ३०७९.१२ प्रती मे.टन येत आहे.

कारखान्याने हंगामात गाळप केलेल्या ऊसास प्रथम अॅडव्हान्स रु. २८००/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम अदा केलेली आहे. गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये कारखान्याने एकूण ११ लाख ३८ हजार ४९६ मे.टन ऊस गाळप केले आहे.

उर्वरित एफ.आर.पी. रु.२८०/- प्रती मे.टनाप्रमाणे रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर रक्कम रु. ३१ कोटी ८७ लाख ७८ हजार सोमवार (दि. ५ मे) रोजी वर्ग करण्यात आली.

कारखान्याने आत्तापर्यंत कार्यक्षेत्र व परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच वेळेमध्ये चांगला दर दिलेला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे.

अधिक वाचा: दुधाळ गाई व म्हशी खरेदीसाठी मिळतंय अनुदान; कसा कराल अर्ज? जाणून घ्या सविस्तर

Web Title: As per FRP, the remaining installment of Rs 280 for sugarcane will be transferred to the bank account of the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.