Lokmat Agro >शेतशिवार > यंदा खरीपात लाल कांदा घ्यायचा विचार आहे का? मग त्याआधी 'या' पिकाची लागवड करून अवशेष जमिनीत गाडा

यंदा खरीपात लाल कांदा घ्यायचा विचार आहे का? मग त्याआधी 'या' पिकाची लागवड करून अवशेष जमिनीत गाडा

Are you planning to grow red onion in Kharif this year? Then plant this crop before that and bury the residue in the soil. | यंदा खरीपात लाल कांदा घ्यायचा विचार आहे का? मग त्याआधी 'या' पिकाची लागवड करून अवशेष जमिनीत गाडा

यंदा खरीपात लाल कांदा घ्यायचा विचार आहे का? मग त्याआधी 'या' पिकाची लागवड करून अवशेष जमिनीत गाडा

Onion Crop Management : महाराष्ट्रातील कृषी पद्धतीत गेल्या काही वर्षांमध्ये बरेच सकारात्मक बदल झाले आहेत. यात सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी सेंद्रिय पद्धतींचा वाढता वापर होय.

Onion Crop Management : महाराष्ट्रातील कृषी पद्धतीत गेल्या काही वर्षांमध्ये बरेच सकारात्मक बदल झाले आहेत. यात सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी सेंद्रिय पद्धतींचा वाढता वापर होय.

शेअर :

Join us
Join usNext

महाराष्ट्रातील कृषी पद्धतीत गेल्या काही वर्षांमध्ये बरेच सकारात्मक बदल झाले आहेत. यात सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी सेंद्रिय पद्धतींचा वाढता वापर होय.

आपल्या कृषी परंपरेत अलीकडे कांदा हे एक महत्त्वाचे नगदी पीक झाले असून त्याच्या चांगल्या उत्पादनासाठी जमिनीचा पोत आणि सुपिकता टिकवणे आवश्यक असते. यासाठी हिरवळीचे खत (Green Manure) हा एक उपयुक्त आणि नैसर्गिक पर्याय आहे.

हिरवळीच्या खताचा अर्थ

हिरवळी म्हणजे काही विशिष्ट पिकांची पेरणी करून ती पीक फुलण्याच्या किंवा वाढीच्या अवस्थेत असतांना जमिनीत परत गाडणे. ही प्रक्रिया मुख्यतः खरीप हंगामात केली जाते. यामुळे जमिनीत सेंद्रिय पदार्थांची वाढ होते नत्राचे प्रमाण वाढते आणि जमिनीची भुसभुशीतपणा सुधारतो.

कांद्याच्या पिकासाठी फायद्याचे हिरवळीचे खत

कांद्याच्या पिकासाठी मुग हे एक अत्यंत उपयुक्त हिरवळीचे पीक आहे. कारण मुग एक डाळीचे पीक असून ते जमिनीत नैसर्गिक नत्र (नायट्रोजन) स्थिर करते. जर मुगाचे पीक वेळेत घेतले गेले, तर त्यातून शेतकऱ्यांना उत्पादन आणि नफा मिळतो. मात्र जर वेळ कमी असेल तर मुग फुला-फुलात निंदून जमिनीत गाडले जाते आणि त्याचा उपयोग हिरवळी खत म्हणून होतो.

हिरवळीच्या खताचे फायदे

नैसर्गिक नत्राची उपलब्धता : डाळीची पिके जमिनीत नत्र स्थिर करतात. हे नत्र पुढील कांदा पिकाला उपलब्ध होऊन रासायनिक खतांची गरज कमी होते.

सेंद्रिय पदार्थांची वाढ : हिरवळीच्या खतामुळे जमिनीत सेंद्रिय घटकांची वाढ होते ज्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो.

मातीची धूप कमी होते : हिरवली पीक जमिनीवर आच्छादन तयार करते त्यामुळे पावसामुळे होणारी मातीची झीज टळते.

मातीतील जिवाणूंची वाढ : सेंद्रिय घटकांमुळे उपयुक्त जिवाणूंना पोषण मिळते आणि मातीचा सजीवपणा टिकतो.

तण नियंत्रण : हिरवळीचे पीक उगवले असताना जमिनीत इतर तण उगवण्यास अडथळा होतो.

कांदा पिकासाठी योग्य वेळ आणि प्रक्रिया

मुगाची पेरणी जून ते जुलैदरम्यान केली जाते. पेरणीनंतर ४५-५० दिवसांनी मुगाचे पीक फुलोऱ्यावर आले की ते ट्रॅक्टरच्या सहाय्याने जमिनीत गाडले जाते. यानंतर १५-२० दिवसांनंतर जमिनीमध्ये कांदा लागवडीसाठी योग्य स्थिती निर्माण होते.

हेही वाचा : एक एकरात किती रोपे? जाणून घ्या 'या' सूत्राच्या मदतीने शेतातील एकरी रोपांची संख्या

Web Title: Are you planning to grow red onion in Kharif this year? Then plant this crop before that and bury the residue in the soil.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.