Lokmat Agro >स्मार्ट शेती > एक एकरात किती रोपे? जाणून घ्या 'या' सूत्राच्या मदतीने शेतातील एकरी रोपांची संख्या

एक एकरात किती रोपे? जाणून घ्या 'या' सूत्राच्या मदतीने शेतातील एकरी रोपांची संख्या

How many plants per acre? Find out the number of plants per acre in the field with the help of this formula | एक एकरात किती रोपे? जाणून घ्या 'या' सूत्राच्या मदतीने शेतातील एकरी रोपांची संख्या

एक एकरात किती रोपे? जाणून घ्या 'या' सूत्राच्या मदतीने शेतातील एकरी रोपांची संख्या

Farming : खरीप हंगाम तोंडावर आला असून राज्यात सर्वत्र शेतकरी बांधव त्या अनुषंगाने तयारी करत आहे. तसेच कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग यांच्या मार्फत देखील शेतकऱ्यांना उत्पादन वाढविण्याचे विविध तंत्र समजावण्यात येत आहे. 

Farming : खरीप हंगाम तोंडावर आला असून राज्यात सर्वत्र शेतकरी बांधव त्या अनुषंगाने तयारी करत आहे. तसेच कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग यांच्या मार्फत देखील शेतकऱ्यांना उत्पादन वाढविण्याचे विविध तंत्र समजावण्यात येत आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

खरीप हंगाम तोंडावर आला असून राज्यात सर्वत्र शेतकरी बांधव त्यानुसार तयारी करत आहेत. तसेच कृषी विज्ञान केंद्रे व कृषी विभाग यांच्या मार्फत शेतकऱ्यांना उत्पादन वाढविण्याच्या विविध तंत्रांची माहिती दिली जात आहे.

शेतामध्ये विविध पिके घेत असताना त्या-त्या पीकपद्धतीनुसार योग्य नियोजन करणे आवश्यक असते. जसे की मशागत, प्रमाणित व उगमक्षम बियाण्यांची निवड, योग्य अंतरावर लागवड, आंतरमशागत, खत व्यवस्थापन, काढणी या सर्व बाबींचे योग्य व्यवस्थापन झाले तरच चांगले उत्पादन मिळते आणि परिणामी चांगले उत्पन्न प्राप्त होते.

आज आपण याच अनुषंगाने पिकांची लागवड करताना एकरी रोपांची संख्या कशी काढावी याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

पिकांचे अंतर मोजणे गरजेचे!

प्रत्येक पिकासाठी विशिष्ट अंतर ठेवावे लागते. जसे की टोमॅटोसाठी २ x १ फूट अंतर, ऊसासाठी ५ x २.५ फूट, कांद्यांसाठी ६ x ४ इंच इत्यादी. या अंतरानुसार एका एकरात किती रोपं लावता येतील हे ठरवता येते.

एकर म्हणजे किती क्षेत्रफळ?

१ एकर म्हणजे ४३,५६० चौ.फूट हे लक्षात घेऊन आपण एका रोपासाठी लागणारे क्षेत्र मोजतो आणि नंतर एकूण क्षेत्रफळातून हे भागून एकरी रोपांची संख्या काढता येते.

एकरी रोपांची संख्या काढण्याचा सूत्र

• एकरी रोपांची संख्या = ४३,५६० ÷ (ओळीतील अंतर x रोपातील अंतर)

टिप : हे अंतर फूट किंवा इंचातच असावे, आणि दोन्ही एकक एकसारखे असावेत.

उदाहरणासाठी काही रोपांची संख्या लक्षात घेऊया!

• उदाहरण १ : टोमॅटोसाठी २ फूट x १ फूट अंतर

४३,५६० ÷ (२ x १) = २१,७८० रोपं प्रति एकर. 

• उदाहरण २ : ऊसासाठी ५ फूट x २.५ फूट अंतर

४३,५६० ÷ (५ x २.५) = ३,४८४ रोपं प्रति एकर.

• उदाहरण ३ : कांद्यांसाठी ६ x ४ इंच मात्र आता येथे इंचाचे फूटमध्ये रूपांतर करावे लागेल त्यानुसार ६ इंच = ०.५ फूट, ४ इंच = ०.३३ फूट (अंदाजे).

४३,५६० ÷ (०.५ x ०.३३) = सुमारे २८,७४९ रोपं प्रति एकर.

मोकळ्या जागेचा विचार 

• एकरी रोपांचे हे गणित करताना बांध, पायवाट, सिंचन इत्यादींसाठी लागणाऱ्या जागेचा विचार करून थोडी कपात करावी. साधारणतः १०% जागा अशी वापरली जाते. त्यामुळे अंतिम एकरी रोपांची संख्या अंदाजे ९०% घेतली जाते.

• उदा. टोमॅटोचे २१,७८० x ९०% = सुमारे १९,६०२ रोपं प्रति एकर.

फायद्याचे 'हे' गणित

रोपांची संख्या योग्य प्रकारे काढल्यास पिकांची घनता, उत्पादन व खर्च याचे योग्य नियोजन करता येते. यामुळे उत्पन्न वाढते आणि नफा जास्त होतो. पेरणीपूर्वी हे गणित शेतातच करून पाहणे फायद्याचे ठरते.

हेही वाचा : खरीप हंगामापूर्वी 'हे' एक काम करा अन् यंदा खतांचा अतिरिक्त खर्च टाळा

Web Title: How many plants per acre? Find out the number of plants per acre in the field with the help of this formula

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.