Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > गांधेली कृविकें निर्मित पशुखाद्य पशुपालक शेतकऱ्यांना ठरेल वरदान - डॉ. इंद्रमणी

गांधेली कृविकें निर्मित पशुखाद्य पशुपालक शेतकऱ्यांना ठरेल वरदान - डॉ. इंद्रमणी

Animal feed produced by Gandheli farmers will be a boon to livestock farmers-Dr. Indramani | गांधेली कृविकें निर्मित पशुखाद्य पशुपालक शेतकऱ्यांना ठरेल वरदान - डॉ. इंद्रमणी

गांधेली कृविकें निर्मित पशुखाद्य पशुपालक शेतकऱ्यांना ठरेल वरदान - डॉ. इंद्रमणी

महात्मा गांधी मिशन संचलित कृषी विज्ञान केंद्र गांधेली अंतर्गत नव्याने सुरू करण्यात आलेल्या पशु आहार प्रकल्पास वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,परभणीचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी तसेच विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी बुधवार (दि. १८) रोजी भेट दिली.

महात्मा गांधी मिशन संचलित कृषी विज्ञान केंद्र गांधेली अंतर्गत नव्याने सुरू करण्यात आलेल्या पशु आहार प्रकल्पास वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,परभणीचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी तसेच विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी बुधवार (दि. १८) रोजी भेट दिली.

महात्मा गांधी मिशन संचलित कृषी विज्ञान केंद्र गांधेली छत्रपती संभाजीनगर अंतर्गत नव्याने सुरू करण्यात आलेल्या पशु आहार प्रकल्पास वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,परभणीचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी तसेच विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी बुधवार (दि. १८) रोजी भेट दिली.

या भेटीदरम्यान त्यांनी प्रकल्पांमधील विविध कार्यपद्धती, पशुखाद्य निर्मितीची प्रक्रिया, कच्चा माल व्यवस्थापन तसेच शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शनाची सविस्तर पाहणी केली. सदर युनिटमध्ये तयार होणारे संतुलित पशुखाद्य हे दुग्ध उत्पादन वाढवण्यासाठी तसेच जनावरांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच कमी खर्चात दर्जेदार खाद्य उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले. शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी आणि पशुपालन व्यवसाय अधिक नफ्यात आणण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. 

या प्रसंगी उपस्थित एमजीएम हिल्सचे संचलक डॉ. के. ए. धापक, एमजीएम कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय व अन्नतंत्र महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. नरेंद्रसिंग चव्हाण, प्रभारी - वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख काकासाहेब सुकासे तसेच विषयतज्ञ पशु व्यवस्थापन डॉ. श्रीकांत खुपसे व कृषि विज्ञान केंद्र येथील इतर विषय तज्ञ व कर्मचाऱ्यांनी युनिटची माहिती सादर केली. 

हेही वाचा : जनावरांना का गरजेचा असतो पशुआहार आणि त्याचे फायदे; जाणून घ्या पशुआहाराविषयी सविस्तर माहिती

Web Title : गांधेली केवीके का पशु आहार: पशुपालक किसानों के लिए वरदान - डॉ. इंद्रमणि

Web Summary : डॉ. इंद्रमणि ने गांधेली केवीके के पशु आहार परियोजना की सराहना की, दूध उत्पादन बढ़ाने, पशु स्वास्थ्य में सुधार करने और किफायती, गुणवत्तापूर्ण चारा प्रदान करने की क्षमता पर प्रकाश डाला। उन्होंने किसान आय और पशुधन खेती में लाभप्रदता बढ़ाने के लिए पहल के महत्व पर जोर दिया।

Web Title : Gandheli KVK's Animal Feed: Boon for Livestock Farmers, says Dr. Indramani

Web Summary : Dr. Indramani praised Gandheli KVK's animal feed project during a visit, highlighting its potential to boost milk production, improve animal health, and provide affordable, quality feed. He emphasized the initiative's importance for increasing farmer income and profitability in livestock farming.