राज्यातील सहकारी उपसा जलसिंचन योजनांच्या प्रकल्प खर्चामध्ये गेल्या काही वर्षात सातत्याने वाढ होत असून, त्यामुळे अल्प व सिमांत शेतकरी सभासदच नव्हे तर मध्यम व मोठया शेतकऱ्यांना सुध्दा वाढता प्रकल्प खर्च करणे आर्थिकदृष्या अडचणीचे झाले आहे.
शासनाच्या खर्चाने ज्या लहान मोठ्या पाटबंधारे योजना हाती घेण्यात येतात त्या योजनांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना कोणत्याही खर्चाविना पाण्याची सोय उपलब्ध होते.
या उलट इतर भागातील शेतकऱ्यांनी स्वतःच उपसा जलसिंचनाची व्यवस्था करण्याचे ठरविल्यास त्यांच्या योजनांचा संपूर्ण खर्च त्यांना स्वतःच करावा लागतो.
त्यामुळे सहकारी उपसा जलसिंचन योजनांच्या लाभधारक सभासदांवरील खर्चाचा बोजा कमी करुन तो काही प्रमाणात शासनाकडून उचलला जावा, या दृष्टीकोनातून सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात सहकारी उपसा जलसिंचन योजनांना अर्थसहाय्य देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडून सदर शासन निर्णयानुसार अनुदान मंजूरीसाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावांपैकी सन २०२५-२६ या वित्तीय वर्षासाठी अनुदान दिले जाणार आहे.
त्यात राज्यातील आठ सहकारी उपसा जलसिंचन संस्थांना रु. ३,१०,८४,६११/- (रुपये तीन कोटी दहा लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे अकरा रुपये फक्त) इतके अनुदान मंजूर करुन वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.
सन २०२५-२६ या वित्तीय वर्षात अनुदान मंजुरीसाठी पात्र ठरलेल्या सहकारी उपसा जलसिंचन संस्थांची यादी खालीलप्रमाणे
| अ.क्र. | संस्थेचे नाव | सभासद संख्या | अनुदानाची रक्कम (₹) |
|---|---|---|---|
| १ | क्रांती अग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्या., बांबवडे, ता. पलूस, जि. सांगली | २४३ | रु. ५३,५८,९४१/-(अनुज्ञेय निधी रु.१,००,००,०००/- पैकी ४६,४१,०५९/-इतके अनुदान दि. २७.०२.२०२५ च्या शासन निर्णयान्वये अदा करण्यात आले. उर्वरित रक्कम रु. ५३,५८,९४१/- इतके अनुदान वितरीत करावयाचे आहे.) |
| २ | श्री. भावेश्वरी सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्या., पैकी कुदळवाडी, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर | ३२ | ७,५१,५५७/- |
| ३ | कै. शिवाजी सिताराम पाटील सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्या., आमशी, ता. करवीर, जि. कोल्हापूर | ५५ | ३१,९०,८११/- |
| ४ | श्री. हनुमान सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्या., बेले, ता. करवीर, जि. कोल्हापूर | ८९४ | ११,३७,०००/- |
| ५ | श्री. हनुमान सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्या., कासार शिरंबे, ता. कराड, जि. सातारा | ४६४ | १,००,००,०००/- |
| ६ | विरसिंग सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्या., आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली | २९ | ५७,५०,००० |
| ७ | मा. आ. के. पी. पाटील सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्या., तळगाव, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर | ८१ | २१,६१,०५७ |
| ८ | श्री. दत्त सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्या., कापूरवाडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर | १३६ | २७,३५,२४५ |
अधिक वाचा: पीएम किसान योजेनेतून अडीच लाख शेतकऱ्यांना का वगळले? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर
Web Summary : Maharashtra approves grants for eight cooperative lift irrigation schemes, aiding farmers facing rising project costs. ₹3.1 crore allocated to institutions across Sangli, Kolhapur, and Satara districts for the fiscal year 2025-26.
Web Summary : महाराष्ट्र ने आठ सहकारी लिफ्ट सिंचाई योजनाओं के लिए अनुदान को मंजूरी दी, जिससे बढ़ती परियोजना लागत का सामना कर रहे किसानों को मदद मिलेगी। वित्तीय वर्ष 2025-26 के लिए सांगली, कोल्हापुर और सतारा जिलों के संस्थानों को ₹3.1 करोड़ आवंटित किए गए।