Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > गायी-म्हैशीत दुधाचा ताप कशामुळे येतो? कशी दिसतात लक्षणे अन् कसे कराल उपचार?

गायी-म्हैशीत दुधाचा ताप कशामुळे येतो? कशी दिसतात लक्षणे अन् कसे कराल उपचार?

What causes milk fever in cows and buffaloes? What are the symptoms and how to treat it? | गायी-म्हैशीत दुधाचा ताप कशामुळे येतो? कशी दिसतात लक्षणे अन् कसे कराल उपचार?

गायी-म्हैशीत दुधाचा ताप कशामुळे येतो? कशी दिसतात लक्षणे अन् कसे कराल उपचार?

गाई-म्हशी वेळेला व्याल्यानंतर ज्यादा दूध देणाऱ्या असूनही अनेकवेळा पहाटे, सकाळी गोठ्यात आडव्या पडलेल्या दितात. त्यांना उठता येत नाही. अंग गार पडून श्वासोच्छ्वास मंद होतो.

सकाळी उठल्यानंतर पशुपालक गोठ्यात जातो, त्यावेळी असे दृश्य पाहिल्यानंतर त्याची भीतीने गाळण उडते. रात्री केव्हातरी अशा प्रकारे गाय-म्हैस आडवी पडली असेल.

खूप वेळ झाला असेल तर जनावर बेशुद्ध पडून मृत्युमुखी देखील पडू शकते. हा एक चयापचय संबंधित रोग असून त्यात मिल्क फीवर किंवा दुधाचा ताप, दुग्धज्वर असे म्हणतात.

यामध्ये ज्वर, ताप असे म्हटले असलेतरी प्रत्यक्ष ताप, ज्वर न वाढता शरीर थंडगार पडलेले असते हे लक्षात घ्या. व्याल्यानंतर साधारण २४ ते ७२ तासात असा प्रकार आढळून येतो.

कशी दिसतात लक्षणे?
◼️ तीन टप्प्यात याची लक्षणे आढळून येतात.
◼️ पहिल्या टप्प्यात जनावराची भूक मंदावते.
◼️ जनावर मलूल दिसते. मागील पायात ताठरपणा येतो.
◼️ शरीराचे तापमान हे नॉर्मल असते.
◼️ दुसऱ्या टप्प्यात जनावर छाती टेकून बसते.
◼️ इंग्रजी एस आकारात मान वळवून पोटात घेते.
◼️ हृदयाचे ठोके वाढलेले असतात.
◼️ नाकपुड्या कोरड्या पडतात.
◼️ पाय, शेपूट, कंबरेचा भाग हा थंड लागतो.
◼️ तापमान हे ९७ ते ९८ डिग्री फॅरेनाईट पर्यंत खाली येते.
◼️ आतड्याची हालचाल मंदावल्यामुळे शेण टाकता येत नाही.
◼️ तिसऱ्या टप्प्यात मात्र जनावर बेशुद्ध अवस्थेत जाते.

कसे कराल उपचार?
◼️ गाईला दूधज्वर झाल्यास घाबरून न जाता तत्काळ तज्ज्ञ पशुवैद्यकांना बोलवून घ्यावे.
◼️ व्यायला झालेल्या जनावरावर बारीक लक्ष ठेवून त्याची कल्पना आपल्या पशुवैद्यकांना देऊन ठेवावी.
◼️ जमल्यास पशुवैद्यकांच्या सल्ल्याने कॅल्शियम सलाईनचा एक दोन बाटल्या खरेदी करून ठेवाव्यात.
◼️ व्याल्यानंतर काढलेल्या चिकात भरपूर कॅल्शियम असते म्हणून कोणत्याही परिस्थितीत सदर चिक गायीला किंवा म्हशीला पाजू नये.
अशाप्रकारे हा आजार आपण टाळू शकतो.

- डॉ. व्यंकटराव घोरपडे
सेवानिवृत्त सहायक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली

अधिक वाचा: सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना आता १० टक्के रक्कम भरून मिळणार सौर कृषीपंप; वाचा सविस्तर

Web Title: What causes milk fever in cows and buffaloes? What are the symptoms and how to treat it?