Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > राज्यातील दूध संकलन केंद्रांतील ‘चिलर्स’च्या वीजदरात मोठी कपात; सुधारित दर कधीपासून लागू?

राज्यातील दूध संकलन केंद्रांतील ‘चिलर्स’च्या वीजदरात मोठी कपात; सुधारित दर कधीपासून लागू?

Major reduction in electricity rates for 'chillers' at milk collection centers in the state; When will the revised rates be applicable? | राज्यातील दूध संकलन केंद्रांतील ‘चिलर्स’च्या वीजदरात मोठी कपात; सुधारित दर कधीपासून लागू?

राज्यातील दूध संकलन केंद्रांतील ‘चिलर्स’च्या वीजदरात मोठी कपात; सुधारित दर कधीपासून लागू?

milk chillers राज्यातील दुग्ध संकलन केंद्रांसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘चिलर्स’च्या वीजदरात कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

milk chillers राज्यातील दुग्ध संकलन केंद्रांसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘चिलर्स’च्या वीजदरात कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

राज्यातील दुग्ध संकलन केंद्रांसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘चिलर्स’च्या वीजदरात कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या (एमईआरसी) नव्या आदेशानुसार, हे सुधारित दर १ जुलै २०२६ पासून लागू होणार आहेत असे मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात सांगितले.

राज्य वीज नियामक आयोगाने दुग्ध प्रक्रिया उद्योगासाठी एकसमान वीज दर लागू करण्याबाबत आमदार अनिल पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्याकडे सौर ऊर्जा उपलब्ध आहे. सौर ऊर्जेच्या उपलब्धतेमुळे सौर कालावधीत वीज खरेदी दरात सुमारे २५ टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, ही सवलत देताना इतर कालावधीतील दरांमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाकडून विशेष सवलत घेऊन दुग्ध संकलन केंद्रांच्या मागणीनुसार स्वतंत्र श्रेणी निश्चित करण्यात आली असून १ जुलै २०२६ पासून ते लागू होणार आहेत. यापूर्वी दरांमध्ये बदल झाले आहेत.

लघुदाब वाणिज्य दर हा प्रति युनिट १६.५५ रुपयांवरून ७.३१ रुपये, उच्चदाब वाणिज्य दर हा  प्रति युनिट १३.८१ रुपयांवरून ९.०६ रुपये. इतका कमी दर दिलेला आहे याचाही फायदा होणार आहे असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सौर तासांमध्ये निर्माण होणारी वीज साठवून ती चोवीस तास कशी वापरता येईल, यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत.

बॅटरी स्टोरेजच्या माध्यमातून ही वीज ग्रीडसाठी देखील उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. भविष्यात कोल्ड स्टोरेजसाठी वीजदर कमी करणे.

तसेच सौर ऊर्जेवर आधारित ‘हायब्रिड कोल्ड स्टोरेज’ उभारण्याबाबतही शासन स्तरावर प्रयत्न करून यासंदर्भात निर्णय घेऊ असे ते म्हणाले.

अधिक वाचा: साडेसात एचपीच्या मर्यादेत वीज वापर आणल्यास शेतकऱ्यांना मिळणार 'या' मोफत वीज योजनेचा लाभ

Web Title : महाराष्ट्र में दूध संग्रह केंद्र चिलर के लिए बिजली दरें कम

Web Summary : महाराष्ट्र सरकार ने दूध संग्रह केंद्र चिलर के लिए बिजली की दरों में कटौती की, जो 1 जुलाई, 2026 से प्रभावी है। एमईआरसी के आदेश के बाद, इस निर्णय का उद्देश्य डेयरी उद्योग का समर्थन करना है। सौर ऊर्जा के उपयोग से और छूट मिलती है। सौर ऊर्जा के उपयोग और हाइब्रिड कोल्ड स्टोरेज समाधानों का पता लगाने के प्रयास जारी हैं।

Web Title : Maharashtra Slashes Electricity Rates for Milk Collection Center Chillers

Web Summary : Maharashtra government significantly reduces electricity rates for milk collection center chillers, effective July 1, 2026. The decision, following MERC orders, aims to support the dairy industry. Solar energy usage offers further discounts. Efforts are underway to utilize stored solar power and explore hybrid cold storage solutions.