lokmat Supervote 2024
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >मासे पालन > खोल समुद्रातील मत्स्य प्रजातींची विविधता धोक्यात; आलंय हे संकट

खोल समुद्रातील मत्स्य प्रजातींची विविधता धोक्यात; आलंय हे संकट

Endangered deep-sea fish species diversity; This crisis has come | खोल समुद्रातील मत्स्य प्रजातींची विविधता धोक्यात; आलंय हे संकट

खोल समुद्रातील मत्स्य प्रजातींची विविधता धोक्यात; आलंय हे संकट

समुद्रातील वाढत्या प्रदूषणामुळे माशांच्या अनेक प्रजातींचे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तर, काही प्रजाती कोकण किनाऱ्यावरून स्थलांतरित होत आहेत. या बाबत पर्यावरणप्रेमींसह मच्छीमारांनी सरकारचे वारंवार लक्ष वेधले आहे.

समुद्रातील वाढत्या प्रदूषणामुळे माशांच्या अनेक प्रजातींचे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तर, काही प्रजाती कोकण किनाऱ्यावरून स्थलांतरित होत आहेत. या बाबत पर्यावरणप्रेमींसह मच्छीमारांनी सरकारचे वारंवार लक्ष वेधले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

हवामानात होणारे बदल आणि एलईडीद्वारे होणाऱ्या बेकायदा मासेमारीमुळे रायगड जिल्ह्यातील मच्छीमार संकटात सापडला आहे. या प्रकारच्या मासेमारीवर वेळीच नियंत्रण मिळवले नाही तर हा व्यवसाय धोक्यात येईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

समुद्रातील वाढत्या प्रदूषणामुळे माशांच्या अनेक प्रजातींचे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तर, काही प्रजाती कोकण किनाऱ्यावरून स्थलांतरित होत आहेत. या बाबत पर्यावरणप्रेमींसह मच्छीमारांनी सरकारचे वारंवार लक्ष वेधले आहे. त्यानंतरही व्यापक प्रमाणात कारवाई होत नाही, असा आरोप आहे.

मच्छीमारांनी दिलेल्या माहितीनुसार घोळ, जिताडा, शेवंड, बॉबील, मांदेली, कर्ली, कोळंबी, पापलेट, सुरमई तसेच खेकडे या प्रजातींचे अस्तित्व काही वर्षांपासून कमी झाले आहे. बेकायदा पर्ससीन, एलईडी मासेमारीच्या अतिरेकाचा हा परिणाम आहे.

प्रदूषणामुळे खाडीतील मासेमारी संपुष्टात
• पारंपरिक मच्छीमारांच्या आर्थिक स्थितीवरही त्याचा परिणाम झाला आहे.
• खाडीतील मासेमारी प्रदूषणामुळे नष्ट झाली असताना आता समुद्रातील अनेक प्रजाती धोक्यात आहेत, याकडे मच्छीमार लक्ष वेधत आहेत.

'कठोर कारवाई करावी' एलईडी आणि पर्ससीन मासेमारी ही खूपच चुकीची आहे. यामुळे माशांच्या प्रजाती नष्ट होण्याचा धोका आहे. शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघाचे संचालक आणि मुरुडच्या सागर कन्या मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष मनोहर बैले यांनी केली आहे.

समुद्रात मिळणारी कोळंबी गायबच झाली आहे. मोठी मासळी तर दिसेनाशी झाली आहे. याला जबाबदार एलईडी आणि पर्ससीन मासेमारी आहे. यांच्यामुळे समुद्रातील लहान जीव नष्ट होत असल्याने उत्पादन घटत आहे. - रोहन निशानदार, मच्छीमार, मुरूड

अधिक वाचा: अतिरिक्त मासेमारीवर येणार रोख; माशांसाठी समुद्रतळाशी कृत्रिम अधिवास

Web Title: Endangered deep-sea fish species diversity; This crisis has come

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.