पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या विविध जिल्हास्तरीय योजनांमध्ये दोन दुधाळ गाई/म्हशीचे अनुसूचीत जाती/जमातीचा लाभार्थींना वाटप करणे ह्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
महत्वाचे
लाभार्थी निवडताना ३० टक्के महिलाना प्राधान्य देण्यात यावे.
लाभार्थी निवडीचे निकष
१) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी.
२) अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्यंतचे भूधारक)
३) अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्यंतचे भूधारक)
४) सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले)
५) महिला बचत गटातील लाभार्थी (अंक १ ते ४ मधील)
योजनेसाठी अर्थसहाय्य
अ) गाईसाठी
बाब | २ जनावरांचा गट (रक्कम रुपयात) |
संकरित गाईचा गट - प्रति गाय रु. ७०,०००/- प्रमाणे | १,४०,००० |
१०.२० टक्के (अधिक १८ टक्के सेवाकर) दराने ३ वर्षाचा विमा | १६,८५० |
एकूण प्रकल्प किंमत | १,५६,८५० |
ब) म्हशीसाठी
बाब | २ जनावरांचा गट (रक्कम रुपयात) |
म्हशीचा गट - प्रति म्हैस रु. ८०,०००/- प्रमाणे | १,६०,००० |
१०.२० टक्के (अधिक १८ टक्के सेवाकर) दराने ३ वर्षाचा विमा | १९,२५८ |
एकूण प्रकल्प किंमत | १,७९,२५८ |
एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे
गट - गाय
प्रवर्ग - शासकीय अनुदान अनुसूचीत जाती ७५ टक्के
२ जनावरांचा गट (रक्कम रुपयात) - १,१७,६३८
गट - म्हशी
प्रवर्ग - शासकीय अनुदान अनुसूचीत जाती ७५ टक्के
२ जनावरांचा गट (रक्कम रुपयात) - १,३४,४४३
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
१) * फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
२) * सातबारा (अनिवार्य)
३) * ८ अ उतारा (अनिवार्य)
४) * अपत्य दाखला (अनिवार्य)/स्वयंघोषणा पत्र
५) * आधारकार्ड (अनिवार्य)
६) * रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य)
७) * बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य)
८) * रेशनकार्ड/कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल. (अनिवार्य)
९) * ७-१२ मध्ये लाभार्थीचे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
१०) * अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
११) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य)
१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत.
१४) वय-जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत.
१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
१६) रोजगार, स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत.
१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत.
अर्ज करण्याचा कालावधी
०२ मे ते ०१ जून २०२५.
अर्ज कसा कराल?
- https://ah.mahabms.com या संकेतस्थळाला किंवा गुगल प्लेस्टोर वरून AH-MAHABMS मोबाईल अॅप डाउनलोड करा.
- टॉप बार मध्ये अर्जदार नोंदणी या मेनू वर क्लिक करा.
- नंतर अर्जदार आवश्यक माहिती भरून नोंदणी करू शकतो.
अधिक माहितीसाठी संपर्क
- पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती/जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी/जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
- कॉल सेंटर संपर्क 1962 (7am to 6pm)
- तांत्रिक अडचण उद्भवल्यास कृपया 8308584478 (10am to 6pm) या भ्रमनध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.
अधिक वाचा: शेळ्या व मेंढ्या खरेदी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु; जाणून घ्या सविस्तर