Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Dudh Anudan : राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती दूध अनुदान मिळणं बाकी; पाहूया सविस्तर

Dudh Anudan : राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती दूध अनुदान मिळणं बाकी; पाहूया सविस्तर

Milk subsidy: How much milk subsidy is left in which district of the state; Let's see in detail | Dudh Anudan : राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती दूध अनुदान मिळणं बाकी; पाहूया सविस्तर

Dudh Anudan : राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती दूध अनुदान मिळणं बाकी; पाहूया सविस्तर

राज्य शासनाने गाय दूध अनुदानापोटी वाटप केलेल्या पहिल्या टप्यात पुणे जिल्हा आघाडीवर राहिला आहे. आतापर्यंत राज्यात वाटप झालेल्या ५३४ कोटी १७ लाख अनुदानापैकी १६९ कोटी ८२ लाख पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादकांना मिळाले आहे.

राज्य शासनाने गाय दूध अनुदानापोटी वाटप केलेल्या पहिल्या टप्यात पुणे जिल्हा आघाडीवर राहिला आहे. आतापर्यंत राज्यात वाटप झालेल्या ५३४ कोटी १७ लाख अनुदानापैकी १६९ कोटी ८२ लाख पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादकांना मिळाले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राजाराम लोंढे
कोल्हापूर : राज्य शासनाने गाय दूध अनुदानापोटी वाटप केलेल्या पहिल्या टप्यात पुणे जिल्हा आघाडीवर राहिला आहे. आतापर्यंत राज्यात वाटप झालेल्या ५३४ कोटी १७ लाख अनुदानापैकी १६९ कोटी ८२ लाख पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादकांना मिळाले आहे.

शासनाने तरतूद केलेल्या ७५८ कोटींपैकी ११० कोटी ८४ लाख रुपये सप्टेंबरअखेरचे अनुदान देय आहे. त्यानंतर ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यातील अनुदान द्यावे लागणार आहे.

गाय दूध खरेदी दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान होऊ नये, यासाठी शासनाने ११ जानेवारी ते १० मार्च या दोन महिन्यांसाठी प्रतिलिटर तीन रुपये अनुदान दूध उत्पादकांना देण्याचा निर्णय घेतला.

११ मार्च ते ३० जूनपर्यंत दूध अनुदान बंद केले होते. त्यानंतर १ जुलै ते ३० सप्टेंबरअखेर प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अनुदानात वाढ करून ऑक्टोबर व नोव्हेंबरसाठी सात रुपये केले.

पहिल्या टप्प्यातील ५३४ कोटी १७ लाख ८० हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील अनुदानापैकी ११० कोटी ८४ लाख ४१ हजार रुपये शेतकऱ्यांना देय आहे.

त्यानंतर जवळपास ६४८ कोटी रुपये हे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यातील दुधासाठी द्यावे लागणार आहेत. महाराष्ट्र शासनाने ७५८ कोटींची तरतूद केली असून दुधाची माहिती भरल्यानंतर तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाचे पैसे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

कोल्हापूरपेक्षा सातारा अनुदानात पुढे
विस्ताराने व दूध उत्पादनात सातारापेक्षा कोल्हापूर पुढे आहे. तरीही दूध अनुदानात सातारा पुढे राहिला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या एकूण दूध उत्पादनाच्या ५० टक्के दूध है हे म्हशीचे आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा दूध अनुदानात राज्यात पाचव्या क्रमांकावर राहिला आहे.

मिळालेले व देय अनुदान

जिल्हावाटपदेय
पुणे१६९.८२ कोटी१३.७३ कोटी
अहिल्यानगर१५२.१२ कोटी२७.८७ कोटी
सोलापूर७५.२१ कोटी१४.५८ कोटी
सातारा३९.६७ कोटी४.०५ कोटी
कोल्हापूर२६.७० कोटी९.५४ कोटी
सांगली२२.३९ कोटी१८.३० कोटी
नाशिक१७.०५ कोटी६.५२ कोटी
छ. संभाजीनगर१०.५६ कोटी५.७३ कोटी
धाराशिव६.९२ कोटी४.१७ कोटी
बीड६.३४ कोटी३.०९ कोटी
जळगाव५.०८ कोटी२.२५ कोटी
नागपूर७९.०३ लाख२६.८० लाख
लातूर७९.०३ लाख१४.६७ लाख
जालना३१.७९ लाख२६.२५ लाख
धुळे२०.६३ लाख४.३३ लाख
अमरावती१८.५४ लाख११.८५ लाख
भंडारा१७.०९ लाख६.२३ लाख
बुलढाणा१४.८० लाख३.६६ लाख
वर्धा५.७३ लाख७५ हजार
परभणी३.९३ लाख८० हजार
नांदेड४६ हजारशून्य

अधिक वाचा: जनावरांना ऊस वाढे खायला देणं कितपत योग्य; त्याचे परिणाम काय? वाचा सविस्तर

Web Title: Milk subsidy: How much milk subsidy is left in which district of the state; Let's see in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.