शेतकरी लम्पी स्किन डिसीजच्या संकटात सापडले आहेत. हा विषाणूजन्य रोग जनावरांच्या त्वचेवर गाठी निर्माण करतो आणि त्यामुळे दूध उत्पादन कमी होऊन आर्थिक नुकसान होते.
रोगाची कारणे, लक्षणे आणि बचावाच्या उपायांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
लम्पी आजाराची कारणे, लक्षणे, निदान कसे?
कारणे
◼️ लम्पी स्किन डिसीज हा कॅप्रिपॉक्स व्हायरसद्वारे होतो.
◼️ हा विषाणू डास, माश्या, गोचीड यांसारख्या किटकांद्वारे पसरतो.
◼️ दूषित पाणी, अन्न किंवा जनावरांच्या प्रत्यक्ष संपर्कातूनही संक्रमण होते.
◼️ भारतात २०१९ पासून हा रोग पसरला असून, २०२५ मध्ये महाराष्ट्रात पुन्हा उद्रेक झाला आहे.
लक्षणे
◼️ ताप येणे
◼️ त्वचेवर २ ते ५ सेमीच्या गाठी (नोड्यूल्स) तयार होणे.
◼️ लिम्फ नोड्स सुजणे.
◼️ जनावरांची भूक कमी होणे.
◼️ दूध उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट.
◼️ गर्भपात किंवा कमजोरी येणे.
◼️ गंभीर प्रकरणात जनावरांचा मृत्यू होऊ शकतो.
निदान
◼️ क्लिनिकल लक्षणांवर आधारित.
◼️ त्वचेच्या नमुन्याचे चाचणी किंवा हिस्टोपॅथॉलॉजीद्वारे.
◼️ प्रारंभिक निदानासाठी पशुवैद्यकाची मदत घ्या.
लम्पीचा प्रसार रोखण्यासाठीच्या या आहेत उपाययोजना?
◼️ जनावरांना गोठ्यात जाळ्या लावून किटकांपासून संरक्षण करा.
◼️ जनावरांच्या हालचालींवर निर्बंध घाला आणि नवीन जनावरे आणताना क्वारंटाइन (विलगीकरण) करा.
◼️ दूषित पाणी आणि चारा, पशुखाद्य टाळा; गोठे नियमित स्वच्छ करा.
◼️ लसीकरण मोहीम राबवा यासाठी गोटपॉक्स व्हॅक्सिन प्रभावी आहे.
◼️ पशुवैद्यकांच्या सल्ल्याने अँटिबायोटिक्स आणि दाहक-विरोधी औषधे द्या.
◼️ गोठ्यात कडूनिंबाच्या पानांचा धूर करा.
अधिक वाचा: शेतकऱ्यांना आता कमी व्याजात पीककर्ज मिळणार; नाबार्ड द्विस्तरीय रचना आणणार