राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवती यांनी आपला स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना उद्योग संचालनालयामार्फत राबविली जाते.
असे आहे योजनेचे स्वरूप
१) योजेनचे स्वरूप मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत प्रक्रिया असलेल्या उत्पादन उद्योगासाठी ५० लाख व सेवा उद्योगासाठी २० लाख रुपयांपर्यंत या प्रकल्प मर्यादेत कर्ज दिले जाते.
२) ज्यात सर्वसाधारण प्रवर्गासाठी ग्रामीण भागासाठी २५ टक्के अनुदान व शहरी भागासाठी १५ टक्के अनुदान दिले जाते, तसेच राखीव प्रवर्गासाठी ग्रामीण भागासाठी ३५ टक्के अनुदान व शहरी भागासाठी २५ टक्के अनुदान दिले जाते
अनुदानाचे स्वरूप
१) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला लाभार्थी, अपंग, माजी सैनिक या प्रवर्गातील अर्जदार यासाठी शहरी भागासाठी बँकेने मंजूर केलेल्या प्रकल्प किमतीच्या २५ टक्के अनुदान दिले जाते.
२) तर, ग्रामीण भागासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला लाभार्थी, अपंग, माजी सैनिक या प्रवर्गातील अर्जदार ३५ टक्के अनुदानासाठी पात्र असतील.
३) यासाठी लाभार्थ्यांना स्वगुंतवणूक ५ टक्के करावी लागेल.
४) या योजनेत उर्वरित सर्व प्रगवर्गातील अर्जदारासाठी शहरी भागासाठी १५ टक्के व ग्रामीण भागासाठी २५ टक्के अनुदानासाठी पात्र असतील, याचबरोबर या लाभार्थ्यांना १० टक्के स्वगुंतवणूक करावी लागेल.
योजनेच्या अटी व शर्थी
१) स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी हे लाभार्थी म्हणून अर्ज करू शकतात.
२) अर्ज करण्यासाठी लाभार्थ्यांचे वय १८ वर्षापासून ४५ वर्षांदरम्यान असावे.
३) तर, अनुसूचित जाती, जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक यांच्यासाठी ५ वर्षे शिथिल केले आहे.
४) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराने यापूर्वी शासनाच्या कोणत्याही अनुदानावर आधारीत स्वयंरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
बेकरी उत्पादन, पशुखाद्य निर्मिती, फॅब्रिकेशनसाठी घ्या कर्ज
बेकरी उत्पादन, पशुखाद्य निर्मिती, फॅब्रिकेशन, चप्पल-बूटनिर्मिती इत्यादीसाठी ५० लाख रुपयांचा प्रकल्पासाठी अर्ज करता येतात. याअंतर्गत सेवा उद्योग व्यवसायासाठी उदा. सलून, रिपेअरिंग व्यवसाय, ब्युटीपार्लर इत्यादीसाठी १० लाख रुपयांपर्यतच्या प्रकल्पासाठी अर्ज करता येईल.
ही कागदपत्रे आवश्यक
अर्जदाराचा फोटो, आधार कार्ड, अधिवास दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला, परीक्षा मार्कशिट, पॅन कार्ड, व्यवसायाचा प्रकल्प अहवाल, जात प्रवर्गातील असेल, तर जातीचा दाखला, अर्जदाराचे हमीपत्र लागते.
अर्ज कुठे करावा? व संपर्क
योजनेसाठी https://maha-cmegp.gov.in/ वर ऑनलाइन अर्ज सादर करावे लागतील.
अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधावा.
अधिक वाचा: मधुमक्षिकापालन हा कृषिपूरक व्यवसाय करून कमवा अधिकच उत्पन्न; योजनेसाठी आजच नोंदणी करा