Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Cow Day : देशी गोवंशाचे संवर्धन शेतीच्या भविष्यासाठी महत्त्वाचे वाचा सविस्तर

Cow Day : देशी गोवंशाचे संवर्धन शेतीच्या भविष्यासाठी महत्त्वाचे वाचा सविस्तर

latest news Cow Day: Conservation of indigenous cattle is important for the future of agriculture. Read in detail | Cow Day : देशी गोवंशाचे संवर्धन शेतीच्या भविष्यासाठी महत्त्वाचे वाचा सविस्तर

Cow Day : देशी गोवंशाचे संवर्धन शेतीच्या भविष्यासाठी महत्त्वाचे वाचा सविस्तर

Cow Day : देशी गायींच्या संवर्धनाशिवाय शेतीचा आणि मातीचा पोत सुधारू शकत नाही, हेच सांगण्यासाठी पुण्यात ‘देशी गोवंश जतन व संवर्धन दिन’ मोठ्या उत्साहात साजरा झाला. देशी गोवंश संवर्धनासाठी काम करणाऱ्या शेतकरी आणि संस्थांचा सन्मान करून गोसेवा आणि नैसर्गिक शेतीच्या महत्त्वावर भर देण्यात आला. (Cow Day)

Cow Day : देशी गायींच्या संवर्धनाशिवाय शेतीचा आणि मातीचा पोत सुधारू शकत नाही, हेच सांगण्यासाठी पुण्यात ‘देशी गोवंश जतन व संवर्धन दिन’ मोठ्या उत्साहात साजरा झाला. देशी गोवंश संवर्धनासाठी काम करणाऱ्या शेतकरी आणि संस्थांचा सन्मान करून गोसेवा आणि नैसर्गिक शेतीच्या महत्त्वावर भर देण्यात आला. (Cow Day)

शेअर :

Join us
Join usNext

पुणे : देशी गायींच्या संवर्धनाशिवाय शेतीचा आणि मातीचा पोत सुधारू शकत नाही, हेच सांगण्यासाठी पुण्यात ‘देशी गोवंश जतन व संवर्धन दिन’ मोठ्या उत्साहात साजरा झाला. (Cow Day)

देशी गोवंश संवर्धनासाठी काम करणाऱ्या शेतकरी आणि संस्थांचा सन्मान करून गोसेवा आणि नैसर्गिक शेतीच्या महत्त्वावर भर देण्यात आला. (Cow Day)

गाईला राज्यमाता आणि गोमातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. राज्यातील १ हजार ६७ पैकी ९६० गोशाळा गोसेवा आयोगाकडे रजिस्टर आहेत. देशी गोवंश संवर्धनासाठी गोसेवा आयोग कटिबद्ध आहे." असे गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा म्हणाले. 

देशी गोवंश जतन व संवर्धन दिनानिमित्त पुणे कृषी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या सप्ताहाची सांगता २२ जुलै रोजी करण्यात आली, या कार्यक्रमात ते बोलत होते. देशी गायींच्या संवर्धनामध्ये चांगले काम करणारे शेतकरी आणि संस्थांचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला. 

देशी गोवंशाचे कृषी संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु, दिवसेंदिवस वाढत्या रासायनिक खतांच्या वापरामुळे माती नापीक होत चालली आहे. 

ही माती वाचवण्यासाठी शेतीमध्ये शेणखताचा वापर वाढणे महत्त्वाचे असून त्यासाठी देशी गोवंश वाचवणे महत्वाचे आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने २२ जुलै हा दिवस 'देशी गोवंश जतन व संवर्धन दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. आजचा हा दिवस राज्यातील गोशाळेमध्ये साजरा केला जात आहे. 

"देशी गाईचे आणि गोवंशाच्या संवर्धन होणे शेती क्षेत्रासाठी महत्त्वाचे असूनबीयेणाऱ्या काळात गोसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि आम्ही राज्यभरात असणाऱ्या गोशाळांना भेटी देऊ आणि देशी गाईचे महत्त्व समजून घेऊ." असे मत विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केले.(Cow Day)

"साधारण २०२९ नंतर कोणत्याही उद्योगाची उंची जेवढी असेल तेवढी उंची शेतीची होईल. शेतीमध्ये भविष्य उज्वल आहे आणि नीट व्यवस्थापन केले तर शेती नक्कीच परवडते. देशी गोवंशाचे संवर्धन कृषी क्षेत्राच्या भविष्यासाठी महत्त्वाचे आहे" असे मत मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले. (Cow Day)

या कार्यक्रमात मंत्री दत्तात्रय भरणे, महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार आणि राहुरी कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांच्यासोबत राहुरी कृषी विद्यापीठाचे काही मान्यवर उपस्थित होते.(Cow Day)

गोसंवर्धनामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान

जनार्दन चव्हाण, जितेंद्र मुरकुटे, दीपक पत्की, मिलिंद ठोंबरे, रामचंद्र ढेबे, सचिन ताम्हाणे, सुनील हरपुडे, रतन भोसले, यशवंत खैरे, नंदू चौधरी, विठ्ठल जगताप, संदीप बोदगे, कु राजविर स्मिता रविंद्र लाड, किरण जाधव, राजेंद्र अथणे, विपुल कृष्णा अष्टेकर, प्रकाश बाफना, मिलिंद कृष्णाजी देवल.

हे ही वाचा सविस्तर : Cow Day : गोमातेचा सन्मान : आता प्रत्येक वर्षी २२ जुलैला गायींसाठी विशेष दिन वाचा सविस्तर

Web Title: latest news Cow Day: Conservation of indigenous cattle is important for the future of agriculture. Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.