Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > भेसळयुक्त दूध ओळखा घरच्या घरी; 'या' घरगुती चाचण्या करतील दूध भेसळीचा पर्दाफाश

भेसळयुक्त दूध ओळखा घरच्या घरी; 'या' घरगुती चाचण्या करतील दूध भेसळीचा पर्दाफाश

Identify adulterated milk at home; 'These' home tests will expose milk adulteration | भेसळयुक्त दूध ओळखा घरच्या घरी; 'या' घरगुती चाचण्या करतील दूध भेसळीचा पर्दाफाश

भेसळयुक्त दूध ओळखा घरच्या घरी; 'या' घरगुती चाचण्या करतील दूध भेसळीचा पर्दाफाश

Milk Adulteration : दूध ही आपल्या दैनंदिन आहारातील एक अत्यंत महत्त्वाची आणि पौष्टिक अन्नघटक आहे. मात्र सध्याच्या घाईगर्दीच्या जीवनशैलीत आणि वाढत्या व्यावसायिक स्पर्धेमुळे दुधात भेसळ होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

Milk Adulteration : दूध ही आपल्या दैनंदिन आहारातील एक अत्यंत महत्त्वाची आणि पौष्टिक अन्नघटक आहे. मात्र सध्याच्या घाईगर्दीच्या जीवनशैलीत आणि वाढत्या व्यावसायिक स्पर्धेमुळे दुधात भेसळ होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

दूध ही आपल्या दैनंदिन आहारातील एक अत्यंत महत्त्वाची आणि पौष्टिक अन्नघटक आहे. मात्र सध्याच्या घाईगर्दीच्या जीवनशैलीत आणि वाढत्या व्यावसायिक स्पर्धेमुळे दुधात भेसळ होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

भेसळयुक्त दूध प्यायल्यामुळे अपचन, विषबाधा, त्वचेचे विकार, लहान मुलांमध्ये वाढीच्या समस्या अशा अनेक आरोग्यविषयक त्रासांना सामोरे जावे लागते. त्यामुळे दूध घेण्यापूर्वी त्याची शुद्धता तपासणे ही काळाची गरज बनली आहे.

अशावेळी घरच्या घरी काही साध्या चाचण्यांच्या मदतीने आपण दूध शुद्ध आहे की भेसळयुक्त हे सहजपणे ओळखू शकतो. अशा चाचण्या केल्याने आपण केवळ स्वतःच्याच नव्हे, तर आपल्या कुटुंबाच्या आरोग्याचीही काळजी घेऊ शकतो.

हातावर फेस तपासा

दुधाला हातावर घेऊन चोळा. जर फेस तयार झाला, तर ते भेसळयुक्त असू शकते. भेसळयुक्त दुधात सोडियम बायकार्बोनेट किंवा तत्सम घटक मिसळले जातात, ज्यामुळे फेस तयार होतो.

पाणी चाचणी

एका काचेच्या ग्लासात थोडे दूध घ्या. शुद्ध दूध तळाशी एकसमान मिसळते; परंतु भेसळयुक्त दूध तळाशी गुठळ्या तयार करतो. जर दूध एकसमान मिसळले नाही, तर ते भेसळयुक्त असू शकते. आपण घेत असलेले दूध शुद्ध आहे का, हे विविध मार्गांनी तपासता येते.

स्टार्चची चाचणी

दुधात स्टार्च मिसळल्यास त्याची घनता वाढते. एका ग्लासमध्ये थोडे दूध घ्या आणि त्यात काही थेंब आयोडीन द्रावण घाला. जर दुधाचा रंग निळा झाला, तर त्यात स्टार्च मिसळलेले आहे, असे समजावे.

साबणाचा वास तपासा

दुधाला साबणाचा वास येत असल्यास, ते भेसळयुक्त असू शकते. साबणाचा वास दुधात मिसळलेल्या केमिकल्समुळे येतो, ज्यामुळे दूध कधी कधी उग्र वास करतो.

युरियाची चाचणी

दुधात युरिया मिसळल्यास त्याचा पीएच बदलतो. लाल लिटमस पेपर घ्या, त्यावर दुधाचे काही थेंब टाका. जर लिटमस पेपरचा रंग निळा झाला, तर दुधात युरिया मिसळलेले आहे.

हेही वाचा : तुमच्या आरोग्यासाठी कोणते खाद्यतेल योग्य; जाणून घ्या कोल्डप्रेस आणि रिफाइन्ड तेलातील फरक

Web Title: Identify adulterated milk at home; 'These' home tests will expose milk adulteration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.