Join us
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादनाच्या तुलनेत राज्यातील प्रत्येकाच्या वाट्याला 'किती' येते दूध! वाचा काय सांगतो एनडीडीबीचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 11:46 IST

Word Milk Day : महाराष्ट्रात प्रति व्यक्ती दररोज फक्त ३४७ ग्रॅम दूध उपलब्ध होत असल्याचे समोर आले आहे. ही उपलब्धता केवळ देशाच्या (४७१ ग्रॅम) सरासरीपेक्षा कमी नाही, तर आठ राज्यांच्या तुलनेतही कमी असल्याचे राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड (एनडीडीबी) च्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्रात प्रति व्यक्ती दररोज फक्त ३४७ ग्रॅम दूध उपलब्ध होत असल्याचे समोर आले आहे. ही उपलब्धता केवळ देशाच्या (४७१ ग्रॅम) सरासरीपेक्षा कमी नाही, तर आठ राज्यांच्या तुलनेतही कमी असल्याचे राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड (एनडीडीबी) च्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

राज्याच्या लोकसंख्येच्या वाढत्या गरजांनुसार, महाराष्ट्रातदूध उत्पादन वाढविण्याची आणि उपलब्धतेत सुधारणा करण्याची गरज असल्याचे या अहवालात नमूद केले आहे. सदरील अहवालात विविध राज्यानुसार काय आकडेवारी समोर आली आहे. जाणून घेऊया त्याविषयची सविस्तर माहिती. 

कोणत्या राज्यात प्रतिव्यक्ती किती दूध उपलब्धता (ग्रॅम)

पंजाब - १,२४५
हरियाणा - १,१०५
राजस्थान - १,१७१
गुजरात - ७००
मध्य प्रदेश - ६७३
कर्नाटक - ५४३
तामिळनाडू - ३८४
जम्मू-काश्मीर - ५७७
हिमाचल प्रदेश - ६४०
उत्तराखंड - ४४६ 
उत्तर प्रदेश - ४५०
तेलंगणा - ४१९ 
आंध्र प्रदेश ७१९

'या' ठिकाणी सर्वात कमी उपलब्धता (ग्रॅम)

अरुणाचल प्रदेश - ३५
मणिपूर ५४
आसाम ८४
मिजोरम ५६

राज्यात सर्वाधिक उत्पादन कुठे?

• अहिल्यानगर हा राज्यातील सर्वात मोठा दूध उत्पादक जिल्हा मानला जातो. महाराष्ट्रात सध्या एकूण ७६ सहकारी दुग्ध संस्था कार्यरत आहेत. उत्पादन वाढवण्यासाठी शासनाकडून विविध पावले उचलण्यात आली.

• यामध्ये विशेषतः दुग्ध उत्पादकांना प्रति लीटर अनुदान देण्याची योजना राबवण्यात आली. सुरुवातीला हे अनुदान प्रति लीटर ५ रुपये होते, मात्र नंतर त्यात वाढ करून ७ रुपये देण्यात आले होते.

दूध उत्पादनात आपला नंबर कितवा ?

राज्य योगदान (%)
उत्तर प्रदेश १६.२१ 
राजस्थान १४.५१ 
मध्य प्रदेश ८.९१ 
गुजरात ७.६५ 
महाराष्ट्र ६.७१ 

हेही वाचा : शेतीला मिळणार तंत्रज्ञानाची साथ; पीक व्यवस्थापनापासून ते बाजारापर्यंत सर्व माहिती आता एका क्लिकवर

टॅग्स :दूधगायदुग्धव्यवसायआरोग्यशेती क्षेत्रशेतकरीमहाराष्ट्रभारत