Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील 'हा' दूध संघ गाय व म्हैस दूध खरेदी दरामध्ये करणार वाढ; किती रुपयांची होणार वाढ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 16:55 IST

dudh kharedi dar vadh संकलन कमी झाल्याने दूध उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी 'गोकुळ'च्या वतीने म्हैस आणि गाय दूध खरेदी दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयांची, तर गाय दुधासाठी दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

म्हैस दूध विक्री दरातही दोन रुपयांची वाढ होणार असून, यावर उद्या, शुक्रवारी होणाऱ्या संचालक मंडळाच्या सभेत शिक्कामोर्तब होणार आहे.

'गोकुळ'च्या दुधाला मुंबई, पुण्यासह सर्वच शहरांमध्ये मागणी वाढत आहे. त्यातही म्हशींचे दूध मुंबईसारख्या शहरात कमी पडत असून, ते वाढविण्यासाठी 'गोकुळ'ने कंबर कसली आहे.

परराज्यातील जातिवंत म्हशी खरेदीच्या अनुदानात मोठ्या प्रमाणात वाढ केल्याने मध्यंतरी दूध संकलन वीस लाख लिटरपर्यंत पोहोचले होते.

मात्र, सध्या संकलन कमी झाल्याने दूध उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी 'गोकुळ'च्या वतीने म्हैस आणि गाय दूध खरेदी दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

म्हैस दूध खरेदी दर प्रतिलिटर एक रुपया, तर गाय दूध खरेदी दरात दोन रुपयांची वाढ होणार आहे.

खरेदीबरोबर म्हैस दूध विक्री दरात दोन रुपयांची वाढदेखील केली जाणार असून, उद्या होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय होऊन शनिवार (दि. २१) पासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

दूध संकलनात महिन्यात तब्बल ३ लाख लिटर घट◼️ 'गोकुळ'ने महिनाभरापूर्वी प्रतिदिन २० लाख लिटर दूध संकलनाचे कलश पूजन केले होते; पण गेल्या महिनाभरात दूध संकलनात कमालीची घट झाली असून, प्रतिदिन ३ लाख लिटरने कमी झाले आहे.◼️ सध्या १७ लाख लिटर संकलन असून, यामध्ये ९ लाख म्हशीचे, तर ८ लाख लिटर गायीचे दूध संकलन आहे. दरवर्षी मार्चपासून दूध उत्पादनावर परिणाम होतो.◼️ पण यंदा फेब्रुवारी महिन्यातच दूध कमी झाल्याने एप्रिल, मे महिन्यात दुधाची टंचाई भासणार हे निश्चित आहे. ओला चारा कमी झाल्याने दुधावर परिणाम झाल्याचे संघ व्यवस्थापनाने सांगितले.

अधिक वाचा: उन्हाळ्यात चटणी करताय? मग कोणत्या मिरचीला काय सुरु आहे दर? वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Gokul increases milk purchase prices for buffalo and cow.

Web Summary : Gokul Dairy to increase buffalo milk purchase price by ₹1/liter, cow milk by ₹2/liter. Buffalo milk sale price also rises by ₹2. Decision aims to boost milk collection, currently at 17 lakh liters daily due to reduced production.
टॅग्स :दूधदुग्धव्यवसायगोकुळशेतकरीकोल्हापूरगायमुंबईपुणे