Join us

आजपासून 'गोकुळ'चे दूध वधारले; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 12:24 IST

Gokul Dudh Dar : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाने (गोकुळ) म्हैस व गाय दूध विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या, सोमवारपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाने (गोकुळ) म्हैस व गाय दूध विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या, सोमवारपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.

मुंबई व पुण्यात प्रतिलिटर ७४ रुपये, तर कोल्हापूरसह इतर ठिकाणी लिटरला ६८ रुपये मोजावे लागणार आहेत. संघाने जानेवारीमध्ये म्हैस, तर महिन्यापूर्वी गाय दूध खरेदी दर दोन रुपयांनी वाढवला होता.

'गोकुळ'च्या म्हैस दुधाला मुंबई व पुणे बाजारपेठेत मोठी मागणी आहे. रोज सरासरी आठ लाख लिटर दुधाची मुंबईत विक्री होते. म्हैस दूध उत्पादनाला चालना देण्यासाठी 'गोकुळ'ने जानेवारी महिन्यातच खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केली होती.

मात्र, त्यांनी विक्री दर स्थिर ठेवला होता. मध्यंतरी गायीच्या खरेदी दरातही दोन रुपयांची वाढ केली. 'अमूल' व 'मदर डेअरी'ने १ मेपासून दूध विक्रीदरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केल्याने 'गोकुळ'ने हा निर्णय घेतला आहे. मुंबई व पुण्यात आता प्रतिलिटर ७४ रुपये होणार आहे.

असा वाढणार प्रतिलिटर दर

म्हैस दूध दर मुंबई व पुणेकोल्हापूर 
सध्याचा दर ७२ ६६ 
वाढीव दर ७४ ६८ 
गाय दूध दर मुंबई व पुणे कोल्हापूर 
सध्याचा दर ५६ ४८ 
वाढीव दर ५८ ५० 

'गोकुळ'ने जानेवारीमध्येच म्हैस दूध खरेदी दरात वाढ केली आहे. त्यात 'अमूल' व 'मदर डेअरी'ने विक्रीदरात अगोदरच वाढ केल्याने संघाने हा निर्णय घेतला आहे. - डॉ. योगेश गोडबोले, कार्यकारी संचालक, गोकुळ.

हेही वाचा : गोटखिंडी येथील थोरात बंधूंनी घेतला आधुनिक शेतीचा ध्यास; केळीतून वर्षाला घेताहेत ६० लाखांचं उत्पन्न

टॅग्स :गोकुळशेतकरीशेतीशेती क्षेत्रकोल्हापूरदुग्धव्यवसायगायदूधमुंबईपुणे