Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > जीवघेण्या आजारांपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी पशुधनास द्या हे कवच

जीवघेण्या आजारांपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी पशुधनास द्या हे कवच

Give this shield to livestock to protect them from life threatening diseases | जीवघेण्या आजारांपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी पशुधनास द्या हे कवच

जीवघेण्या आजारांपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी पशुधनास द्या हे कवच

Janavrantil Lasikaran जनावरांच्या सुदृढ आरोग्याठी व शेतीस जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी जनावरांना मान्सूनपूर्व लसीकरण करणे काळाची गरज आहे.

Janavrantil Lasikaran जनावरांच्या सुदृढ आरोग्याठी व शेतीस जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी जनावरांना मान्सूनपूर्व लसीकरण करणे काळाची गरज आहे.

शेअर :

Join us
Join usNext

जनावरांच्या सुदृढ आरोग्याठी व शेतीस जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी जनावरांना मान्सूनपूर्व लसीकरण करणे काळाची गरज आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीला वातावरणातील आर्द्रता, तापमानातील बदल, चिखल, पाणी साचणे आदी कारणांमुळे जनावरांचे आरोग्य बिघडते.

प्रसंगी मृत्यूही ओढवू शकतो. यासाठी प्रत्येक पशुपालकांनी जनावरांना मान्सूनपूर्व लसीकरण करून घेणे अत्यावश्यक आहे.

लसीकरण म्हणजे काय? तर विशिष्ट रोगजनक सूक्ष्मजीव किंवा त्यांचे अंश (अँटीजन) जनावरांच्या शरीरात टोचून त्यांच्या शरीराला त्या रोगाविरुद्ध रोगप्रतिकारशक्ती करून देण्याची प्रक्रिया होय.

लसीकरणामुळे जनावरांच्या शरीरात जेव्हा रोगाचा प्रसार होतो त्यावेळी हे लसीकरण रामबाण उपाय ठरते. मान्सूनपूर्व काळात वातावरणातील बदलामुळे बॅक्टेरीया, विषाणू व फंगल मोठ्या प्रमाणावर वाढतात.

जनावरांना यामुळे गळघोटू, ब्लॅक क्वार्टर, लाळ खुरकत, लंपी स्किन डिसीज, एंथ्रेक्स, एंटरोटॉक्सिमिया, हायड्रोपेरिकार्डीयम यांसारख्या रोगांची लागण होण्याची शक्यता असते.

परिणामी दूध उत्पादनात घट, वजनवाढ बंद, गर्भपात, वंध्यत्व आदींमुळे पशुपालकांना आर्थिक फटका सहन करावा लागतो.

यासाठी लसीकरण वेळीच केल्याने जनावरांच्या प्रतिकारशक्तीस चालना मिळून शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. जे रोगांपासून संरक्षण करतात. संपूर्ण कळपाचे लसीकरण केल्यास हर्ड इम्युनिटी निर्माण होते.

महत्त्वाच्या लसींचे वेळापत्रक
गळघोटू : मे जून (दरवर्षी एकदा)
ब्लॅक क्वार्टर : मे-जून (दरवर्षी एकदा)
लाळ खुरकत : एप्रिल व ऑक्टोबर (दर सहा महिने)
लंपी स्किन : एप्रिल-मे (दरवर्षी एकदा)
एंटरोटॉक्सिमिया : वय ३ महिन्यांपासून (दरवर्षी)

लसीकरणासाठी शासनाच्या योजना कार्यरत असून, राष्ट्रीय पशुधन रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत लाळ खुरकत व ब्रुसेलोसिससाठी लसीकरण करण्यात येते. जिल्हा परिषद, पंचायत समिती व दवाखान्यात नाममात्र दरात लसीकरण मोहिमा राबविण्यात येतात. यासाठी जनावरे निरोगी असणे व लसीकरणानंतर जनावरांना विश्रांती देणे आवश्यक आहे. मान्सूनपूर्व लसीकरण हे प्रत्येक पशुपालकांनी आपल्या जनावरांना देऊन पशुधन वाचविणे हे आपल्याच हाती आहे. - डॉ. सुहास गोंदकर, पशुधन विकास अधिकारी वर्ग- १, सोनी, ता. मिरज

अधिक वाचा: जनावरांत युरियाची विषबाधा कशी होती? कसे कराल उपाय? वाचा सविस्तर

Web Title: Give this shield to livestock to protect them from life threatening diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.