Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > Dudh Anudan : दूध उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत अनुदान पुढील आठवड्यात मिळणार

Dudh Anudan : दूध उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत अनुदान पुढील आठवड्यात मिळणार

Dudh Anudan : Milk producers will receive the overdue subsidy in next week | Dudh Anudan : दूध उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत अनुदान पुढील आठवड्यात मिळणार

Dudh Anudan : दूध उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत अनुदान पुढील आठवड्यात मिळणार

Dudh Anudan शासनाच्या गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रतिलिटर ५ व ७ रुपये अनुदान योजनेंतर्गत जिल्ह्यातील खासगी व सहकारी दूध संघांकडील ४९ हजार गाय दूध उत्पादकांचे १८ कोटी रुपये अनुदान थकीत आहे.

Dudh Anudan शासनाच्या गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रतिलिटर ५ व ७ रुपये अनुदान योजनेंतर्गत जिल्ह्यातील खासगी व सहकारी दूध संघांकडील ४९ हजार गाय दूध उत्पादकांचे १८ कोटी रुपये अनुदान थकीत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

मिरज : शासनाच्या गायदूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रतिलिटर ५ व ७ रुपये अनुदान योजनेंतर्गत जिल्ह्यातील खासगी व सहकारी दूध संघांकडील ४९ हजार गाय दूध उत्पादकांचे १८ कोटी रुपये अनुदान थकीत आहे.

पुढील आठवड्यात दूध उत्पादकांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे दुग्धविकास अधिकारी नामदेव दवडते यांनी सांगितले.

१ डिसेंबरपासून शासनाने दूध अनुदान योजना बंद केली आहे. जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत खासगी व सहकारी दूध संघाकडे पाठवलेल्या दुधाचे २२ कोटी अनुदान दिले असून, आणखी १८ कोटी अनुदान बाकी आहे.

या अनुदानाची रक्कम चार दिवसात मिळणार असून, पुढील आठवड्यात जिल्ह्यातील संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा करण्यात येणार असल्याचे नामदेव दवडते यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडरचे दर पडल्याने शेतकऱ्यांना अनुदान म्हणून १० जानेवारी ते १० मार्च यादरम्यान दुग्धविकास विभागाने ही योजना सुरू केली.

जिल्ह्यात चितळे डेअरीचे सर्वाधिक सभासद असून, त्यानंतर राजारामबापू दूध संघ, फत्तेसिंगराव नाईक दूध संघ, अग्रणी मिल्क, संपतराव देशमुख, शिवनेरी मिल्क यासह इतर सहकारी व खासगी दूध संघाच्या सभासदांना दुधाचे थकीत अनुदान मिळणार आहे.

डिसेंबरपासून अनुदान योजना थांबवली
१) म्हशीसाठी प्रतिलिटर पाच रुपये १ व प्रतिलिटर सात रुपये गायीच्या दुधासाठी ही अनुदान योजना होती. आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडरचे दर वाढल्याने डिसेंबर महिन्यापासून अनुदान योजना थांबवली आहे.
२) जिल्ह्यातील ४१ खासगी व सहकारी दूध संघांशी संलग्न सुमारे ४९ हजार गाय दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर अनुदान जमा होणार आहे.
३) जिल्ह्यात दैनंदिन पंधरा लाख लिटर दूध उत्पादनापैकी नऊ लाख लिटर दूध फक्त गायीचे आहे. आता उन्हाळ्यात दुधाचे दर वाढल्याने दूध उत्पादकांना चांगलाचा दिलासा मिळाला आहे.

अधिक वाचा: उन्हाळ्यात जनावरांना पिण्यासाठी दिवसाला किती पाणी लागते? व ते कसे द्यावे? वाचा सविस्तर

Web Title: Dudh Anudan : Milk producers will receive the overdue subsidy in next week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.