आटपाडी : आटपाडी तालुक्यातील प्रसिद्ध आठवडी शेळी-मेंढी बाजारात शनिवारी विक्रमी दर मिळाल्याने जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.
लवटेवाडी येथील एका मेंढीला ३४ हजार विक्रमी दर मिळाला, तर सहा मेंढ्यांची विक्री २ लाखांत झाली. शेतकऱ्यांनी विक्रीनंतर आनंदोत्सव साजरा केला.
अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर या बाजारात तानाजी लवटे, अप्पा लवटे, अमोल लवटे या लवटेवाडीतील मेंढ्यांची खरेदी सांगोला तालुक्यातील सादिक खाटीक (रा. कोळा) यांनी केली. एका मेंढीस ३४ हजार, तर इतर पाच बकऱ्यांना उच्च दर मिळाला.
राज्यातून हजारो शेतकऱ्यांची हजेरी
◼️ आटपाडी बाजार समितीच्या आवारात पारदर्शक पद्धतीने खरेदी-विक्री होण्यामुळे या बाजाराची लोकप्रियता वाढली आहे.
◼️ प्रत्येक शनिवारी भरविण्यात येणाऱ्या या बाजारात कराड, पुणे, सोलापूर, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह राज्यातील विविध भागातून व्यापारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने हजेरी लावतात.
◼️ शेळी-मेंढीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा बाजार म्हणजे मोठी आर्थिक संधी ठरत आहे.
अधिक वाचा: e pik pahani : ई-पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना ४५ दिवसांचा स्वतंत्र कालावधी मिळणार