Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >कृषी प्रक्रिया > मुख्यमंत्री कृषी आणि अन्न प्रक्रिया योजनेतून कोणकोणते प्रक्रिया उद्योग सुरु करता येतात? वाचा सविस्तर

मुख्यमंत्री कृषी आणि अन्न प्रक्रिया योजनेतून कोणकोणते प्रक्रिया उद्योग सुरु करता येतात? वाचा सविस्तर

Which processing industries can be started under the Chief Minister's Agriculture and Food Processing Scheme? Read in detail | मुख्यमंत्री कृषी आणि अन्न प्रक्रिया योजनेतून कोणकोणते प्रक्रिया उद्योग सुरु करता येतात? वाचा सविस्तर

मुख्यमंत्री कृषी आणि अन्न प्रक्रिया योजनेतून कोणकोणते प्रक्रिया उद्योग सुरु करता येतात? वाचा सविस्तर

mukhyamantri krushi va anna prakriya yojana मुख्यमंत्री कृषी आणि अन्न प्रक्रिया योजना हा आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कृषी उत्पादनाच्या मूल्यवर्धनास प्रोत्साहन देण्यासाठी, निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कृषी आणि अन्न प्रक्रियेसाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा एक उपक्रम आहे.

mukhyamantri krushi va anna prakriya yojana मुख्यमंत्री कृषी आणि अन्न प्रक्रिया योजना हा आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कृषी उत्पादनाच्या मूल्यवर्धनास प्रोत्साहन देण्यासाठी, निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कृषी आणि अन्न प्रक्रियेसाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा एक उपक्रम आहे.

शेअर :

Join us
Join usNext

अन्नप्रक्रिया उद्योग क्षेत्राच्या वाढीला चालना देण्यासाठी शासनाने मेगा फूड पार्क योजना, कोल्ड चेन योजना, पायाभूत सुविधा विकास योजना आणि मुख्यमंत्री कृषी आणि अन्न प्रक्रिया योजना यासह अनेक उपक्रम सुरू केले आहेत.

याव्यतिरिक्त प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना (PMFME) या योजनेचे उद्दिष्ट सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रमांना औपचारिक करणे आणि अद्यावत करणे आहे.

मुख्यमंत्री कृषी आणि अन्न प्रक्रिया योजना
मुख्यमंत्री कृषी आणि अन्न प्रक्रिया योजना हा आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कृषी उत्पादनाच्या मूल्यवर्धनास प्रोत्साहन देण्यासाठी, निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कृषी आणि अन्न प्रक्रियेसाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा एक उपक्रम आहे.

या योजनेचा प्रमुख उद्देश ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करून नवीन अन्न प्रक्रिया युनिट्स उभारण्यासाठी किंवा विद्यमान युनिट्सचे स्तरवृद्धी, विस्तारीकरण व आधुनिकीकरण करण्यासाठी तसेच मुल्यवर्धन, शीतसाखळी आणि साठवणुकीच्या पायाभूत सुविधा इत्यादींसाठी उद्योजकांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे.

पात्रता
१) लाभार्थीचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे.
२) लाभार्थीकडे आधार कार्ड/पॅन कार्ड असावे.
३) लाभार्थ्याकडे चांगला बँक सिबिल स्कोअर असावा.
४) लाभार्थ्यांकडे ७/१२ प्रमाणपत्र आणि ८-अ प्रमाणपत्र किंवा भाडेपट्टीची कागदपत्रे असावीत.

पात्र उद्योग
१) तृणधान्य, कडधान्य, फळे, भाजीपाला, तेलबिया, मसाला, औषधी व सुगंधी वनस्पती इ. प्रक्रिया उद्योग.
२) गुळ उद्योग, वाईन उद्योग, दुग्ध व पशुखाद्य प्रकल्प.
३) भरडधान्यावरील प्रक्रिया व मुल्यवर्धन यावर विशेष भर.

संपर्क
या योजनेची पुढील पाच वर्षांसाठी २०२६-२७ पर्यंत वाढवण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी अधिकारी जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयाला भेट द्या. अथवा आपल्या जवळील उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाला भेट द्या.

अधिक वाचा: युट्युबवर पाहिली शेवग्याची शेती; आता स्वत:च करतोय शेवग्याची पावडर अमेरिकेला निर्यात

Web Title: Which processing industries can be started under the Chief Minister's Agriculture and Food Processing Scheme? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.