Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >कृषी प्रक्रिया > Naisargik Rang : शेतीतील या उत्पादनांपासून कसे बनवाल नैसर्गिक रंग? वाचा सविस्तर

Naisargik Rang : शेतीतील या उत्पादनांपासून कसे बनवाल नैसर्गिक रंग? वाचा सविस्तर

Naisargik Rang : How to make natural colors from these agricultural products? Read in detail | Naisargik Rang : शेतीतील या उत्पादनांपासून कसे बनवाल नैसर्गिक रंग? वाचा सविस्तर

Naisargik Rang : शेतीतील या उत्पादनांपासून कसे बनवाल नैसर्गिक रंग? वाचा सविस्तर

Rang Panchami रंगपंचमी, होळी, धुळवड सणांना मोठ्या प्रमाणत रंगांची उधळण केली जाते. रासायनिक रंगांचा वापर टाळून नैसर्गिक रंगांचा वापर करत हा रंगोत्सव रंगतदारपणे साजरा केला जाऊ शकतो.

Rang Panchami रंगपंचमी, होळी, धुळवड सणांना मोठ्या प्रमाणत रंगांची उधळण केली जाते. रासायनिक रंगांचा वापर टाळून नैसर्गिक रंगांचा वापर करत हा रंगोत्सव रंगतदारपणे साजरा केला जाऊ शकतो.

शेअर :

Join us
Join usNext

रंगपंचमी, होळी, धुळवड सणांना मोठ्या प्रमाणत रंगांची उधळण केली जाते. रासायनिक रंगांचा वापर टाळून नैसर्गिक रंगांचा वापर करत हा रंगोत्सव रंगतदारपणे साजरा केला जाऊ शकतो.

बाजारात मिळणारे रासायनिक रंग लेड ऑक्साईड, पारा, क्रोमियम, कॉपर सल्फेट आणि काचेचे सूक्ष्म तुकडे यासारख्या विषारी घटकांनी बनवलेले असतात, हे घटक त्वचा, डोळे, यकृत आणि किडनीवर गंभीर परिणाम करतात.

तसेच हवा, पाणी आणि मातीचे सुद्धा प्रदूषण वाढवतात. यासाठी नैसर्गिक फुले, पाने आणि भाज्यांपासून बनवलेले रंग वापरणे योग्य आहे.

नैसर्गिक स्त्रोतांपासून रंग
सदाफुली, गोकर्णाचे फूल, झेंडू, जास्वंद, पळस, शेवंती, बीट, डाळिंब, काटेसावरीची बोंडे, हळद, पालक यासारख्या नैसर्गिक स्रोतांपासून सुरक्षित रंग तयार करता येतात.

असे बनवा नैसर्गिक रंग
१) हिरवा रंग

पालकाची पाने, कोथिंबीर, पुदिन्याची पाने, मोहरीची पाने, मुळ्याची पाने वाळवून त्याची पूड केल्यास हिरवा रंग तयार करता येतो.
२) लाल रंग
बीट, लाल जास्वंद, लाल गुलाबाचे फुल, टोमॅटो, लाल चंदन, डाळिंब उकळून बारीक करून आणि वाळवून लाल रंग तयार करता येतो.
३) पिवळा रंग
पिवळ्या झेंडूचे फूल आणि हळद उकळून बारीक करून आणि वाळवून पिवळा रंग तयार करता येतो.
४) काळा रंग
आवळा उकळून काळा रंग तयार होतो. आवळा लोखंडी भांड्यात उकळून रात्रभर थंड होण्यासाठी ठेवा.
५) गुलाबी रंग
सुक्या कांद्याची गुलाबी रंगाची साले भिजवून तसेच बीट उकळून गुलाबी रंग तयार करता येतो.
६) केशरी रंग
केशरी झेंडूचे फूल, शेंद्रीचे बी, पारिजातकाच्या देठापासून केशरी रंग तयार करता येतो.
७) जांभळा रंग
जांभळाच्या बिया उकळून आणि जांभळ्या शेवंती किंवा अस्टरच्या फुलाचा चुरा करून आणि वाळवून जांभळा रंग तयार करता येतो.
८) निळा रंग
गोकर्णाची फुले पाण्यात भिजवून निळा रंग तयार करता येतो.

नैसर्गिक रंग शरीरास अनुकूल आणि पर्यावरणपूरक असल्याने त्याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे सर्वांनी नैसर्गिक रंगांचा स्वीकार करून सुरक्षित आणि निरोगी धुळवड आणि त्यानंतर पाच दिवसांनी येणारी रंगपंचमी साजरी करावी. बाजारात मिळणारे केमिकल मिश्रीत रंगांचा वापर टाळावा.

अधिक वाचा: हळद काढणीनंतर कमी खर्चात सोप्या पद्धतीने अशी करा हळदीवर प्रक्रिया; वाचा सविस्तर

Web Title: Naisargik Rang : How to make natural colors from these agricultural products? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.